Disha Patani - Tiger Shroff Spotted Together Saam TV
मनोरंजन बातम्या

Disha Patani - Tiger Shroff Together : टायगर श्रॉफ - दिशा पटानी एकत्र ? ब्रेकअपनंतरच्या पहिल्या भेटीचा व्हिडिओ व्हायरल

Disha Patani and Tiger Shroff : टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी ब्रेकअपनंतर एकत्र दिसले आहेत.

Pooja Dange

Disha Patani - Tiger Shroff Spotted Together : बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी रिलेशनशिप आणि ब्रेकअपविषयी बहुतेकांना माहित आहे. दोघांचे ब्रेकअप झाले असले तरी दिशाच्या वाढदिवशी टायगरने तिला शुभेच्छा दिल्या होत्या. पण ब्रेकअपनंतर दोघे एकत्र कधीच दिसले नव्हते. पण हे आता घडलं आहे.

टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी ब्रेकअपनंतर एकत्र दिसले आहेत. दिल्लीत झालेल्या कार्यक्रमासाठी दोघेही मुंबईहून एकाच फ्लाइटने प्रवास करत होते. त्यांचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत, ज्यामध्ये टायगर आणि दिशा एकमेकांच्या शेजारी बसून एकमेकांशी बोलत आहेत. काही चाहत्यांना तर हे दोघे पुन्हा एकत्र येणार आहेत का याची उत्सुकता लागली आहे. (Latest Entertainment News)

दिल्लीत झालेल्या या कार्यक्रमात टायगर श्रॉफ आणि दिशा एकत्र आल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. परंतु दोघेही पापाराझींसमोर एकत्र आले नाही. टायगर पोज देत असताना दिशा पटानी थांबली. तो गेल्यानंतरच दिशा पोज देण्यासाठी पापाराझींसमोर आली.

या कार्यक्रमात टायगर श्रॉफने ब्लॅक टी-शर्ट, पॅन्ट आणि शूज घातले होते. तर दिशाने जांभळ्या रंगाचा क्रॉप टॉप आणि पांढरी पँटसह स्नीकर्स घातले होते. यासोबतच दोघांनी डार्क ग्लासेसही घातले होते.

या कार्यक्रमात दिशा पटानी आणि टायगर एकमेकांच्या शेजारी बसले होते. यासोबत टायगरची बहीण कृष्णा श्रॉफ त्याची आई आयशा श्रॉफसोबत दिशाच्या शेजारी बसली होती. इव्हेंटमधील काही फोटोंमध्ये दिशा आणि टायगर एकत्र हसताना दिसले परंतु पापाराझींच्या कॅमेरासोमोर मात्र दोघांनी वेगवेगळ्या पोज दिल्या.

कृष्णा श्रॉफबद्दलऑल ब्लॅक आउटफिटमध्ये दिसली. या कार्यक्रमात तिने डॅनीचा मुलगा रिनझिंग डेन्झोंगपासह अनेक लोकांना भेटताना दिसली. यासोबतच दिशा आणि टायगर या कार्यक्रमातून सर्वांच्या आधी निघून गेले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT