Yere Yere Paisa 3  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Yere Yere Paisa 3 : संजय जाधव पुन्हा पाडणार पैशांचा पाऊस, यावेळी काय असणार ट्विस्ट?

Sanjay Jadhav : संजय जाधव यांचा मराठी चित्रपट 'ये रे ये रे पैसा ३' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रिलीज डेट जाणून घ्या.

Shreya Maskar

'ये रे ये रे पैसा' (Yere Yere Paisa 3 ) या चित्रपटाने बॉक्स ऑफिस गाजल्यानंतर आता 'ये रे ये रे पैसा ३' हा सिनेमा चित्रपटगृहांत धुमाकूळ घालणार आहे. आज दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. हा चित्रपट 3 जानेवारी 2025 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

'ये रे ये रे पैसा ३' या दमदार चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा संजय जाधव (Sanjay jadhav) यांनी सांभाळली आहे. चित्रपटाचे संवाद लेखन अरविंद जगताप यांनी केलं आहे. या चित्रपटात गायिका वैशाली सामंत हीने देखील आपल्या आवाजाने चित्रपटाचा दर्जा वाढवला आहे. 'ये रे ये रे पैसा ३' मध्ये तगडी स्टारकास्ट पाहायला मिळत आहे. या चित्रपटात संजय नार्वेकर, सिद्धार्थ जाधव, विशाखा सुभेदार, उमेश कामत, तेजस्विनी पंडित, आनंद इंगळे, नागेश भोसले, वनिता खरात, जयवंत वाडकर हे कलाकार पाहायला मिळत आहे.

संजय जाधव कायमच प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची भन्नाट मेजवानी घेऊन येतात. त्यांच्या 'ये रे ये रे पैसा'चित्रपटाने देखील चाहत्यांना खूप आनंद दिला होता. पैसा मिळवण्याची धमाल गोष्ट येथे आपल्याला पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात अभिनयाची जुगलबंदी पाहता येणार आहे. नव्या वर्षात मनोरंजनाचा धमाका पाहायला मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: लग्नाला ३ वर्षे होऊनही मूल होत नाही, नवरा बायकोला घेऊन मांत्रिकाकडे गेला; शेतात नेऊन केला बलात्कार

Maharashtra Live News Update: लातूरमध्ये जिल्हा परिषदच्या विद्यार्थ्यांनी भरवली मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर शाळा

Meta कडून 1 कोटी Facebook अकाउंट ब्लॉक; यात तुमचा तर अकाउंट नाही ना? का केली कारवाई?

Ambenali Ghat Closed : आंबेनळी घाटातील वाहतुकीवर १५ ऑगस्टपर्यंत निर्बंध, दरड कोसळण्याचा धोका

Fact Check: दारू 50 टक्क्यांनी महागणार? मद्यपींच्या खिशाला मोठी कात्री? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT