Ved Marathi Movie Poster Instagram/ @riteishd
मनोरंजन बातम्या

Ved Box Office Collection: रितेश- जेनेलियानं प्रेक्षकांना लावलं 'वेड'; बॉक्स ऑफिसवर 'छप्परफाड' कमाई...

रितेश देशमुख दिग्दर्शित वेड चित्रपटाने अवघ्या महाराष्ट्राला वेड लावले आहे.

Chetan Bodke

Ved Box Office Collection: रितेश देशमुख दिग्दर्शित वेड चित्रपटाने अवघ्या महाराष्ट्राला वेड लावले आहे. चित्रपटात प्रमुख भूमिकेत मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख सह पत्नी जेनेलिया देशमुख आहे. चित्रपटाच्या घोषणेपासूनच चित्रपटाविषयी उत्सुकता लागली होती.

चित्रपटाच्या ट्रेलरसह, गाण्यांना आणि त्यातील संवादांना सोशल मीडियावर युजर्सना वेड लावले होते. हा चित्रपट ३० डिसेंबर २०२२ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. गेल्या तीन दिवसांमध्ये चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड केली आहे.

चित्रपटाचे दिग्दर्शन रितेशने केले असून निर्मिती जेनेलिया करते. जेनेलियाने पहिल्यांदाच मराठी चित्रपटाची निर्मिती केली आहे. ती यापूर्वी लयभारी चित्रपटातही भूमिकेत होती. प्रदर्शनाआधीच चित्रपट ट्रेंडिंग वर होता.

गाण्यांचीही सोशल मीडियावर बरीच चर्चा होत आहे. सिनेमा प्रदर्शित होताच चित्रपट हाऊसफुल्ल झाला होता. या चित्रपटाने पहिल्या तीन दिवसातच कोट्यावधींची कमाई केली आहे. त्यामुळे या चित्रपटाकडे बेस्ट फिल्म म्हणून पाहिले जात आहे.

ट्रेड अॅनालिस्ट तरुण आदर्श यांनी चित्रपटाच्या कमाईचे आकडे सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यानुसार पहिला दिवशी २.२५ कोटींची कमाई तर दुसऱ्या दिवशी ३.२५ कोटी इतकी कमाई तर तिसऱ्या दिवशी ४.५० कोटींचा गल्ला या चित्रपटाने गमावला आहे. तीन दिवसातच चित्रपटाने १० कोटींचा गल्ला जमावला आहे.

‘वेड’च्या कमाईचे हे आकडे नववर्षाच्या शुभमुहूर्तावर मराठी चित्रपटसृष्टीत नवं चैतन्य निर्माण करणारे आहेत. येत्या काही दिवसांत रितेश- जेनेलियाचा चित्रपट चांगलाच मोठा पल्ला गाठणार आहे, अशी आशा जाणकार व्यक्त करत आहेत.

चित्रपटाची थोडक्यात कथा

क्रिकेट खेळण्यात माहिर असलेला सत्या आणि त्याच्या खऱ्या प्रेमाची कथा चित्रपटात पाहायला मिळणार आहे. शेखरआण्णा हा सत्याचा वैरी दाखवण्यात आला असून त्याचे मुख्य कारण चित्रपट पाहिल्यावरच कळेल. सत्याचे श्रावणीसोबत लग्न होऊन सात वर्ष झाले आहेत, पण त्यांच्या नात्यामध्ये एक मोठी दरी निर्माण झाली आहे.

गावगुंड असणारा सत्या नेहमीच नशेच्याच आहारी गेलेला दाखवला आहे. रेल्वेत कामाला असणारी श्रावणी सत्याला नेहमी दारु सिगारेटला पैसे देते, सोबतच पतीसाठी सर्वच घरच्यांसाठी भांडत असते, ती आपल्या नवऱ्यासाठी माहेरच्या लोकांसोबतही भांडते. एवढे असूनही त्यांच्या नात्यात दुरावा का? याचं उत्तर १२ वर्षांपूर्वाीच्या फ्लॅशबॅकमध्ये मिळते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : नगरमधील पॅथॉलॉजिकल लॅबचे तज्ञ डॉक्टरांवर गंभीर गुन्हे दाखल

राज ठाकरे राजकारणातील नापास माणूस; अजित पवारांच्या पायाची धूळ, सदावर्तेंनी पुन्हा डिवचलं

Smriti Mandhana Marriage: स्मृती मानधनाचं ठरलं! कोणाशी बांधणार लगीनगाठ?

Kalyan : कल्याणमध्ये केडीएमसीच्या घंटागाडीची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी, व्हिडिओ व्हायरल

Political News : मोठी बातमी! भाजप खासदारावर जीवघेणा हल्ला, राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT