Ekda Yeun Tar Bagha Movie Saam Tv
मनोरंजन बातम्या

Ekda Yeun Tar Bagha Movie: पोट धरून हसायला तयार राहा, ‘एकदा येऊन तर बघा’चा हिंदी रिमेक येतोय भेटीला

Ekda Yeun Tar Bagha Hindi Remake: या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली. चित्रपटातील गाणी, डायलॉग, पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले. या चित्रपटाने प्रेक्षकांना खळखळवून हसवलं. या चित्रपटामध्ये एक-दोन नाही तर तब्बल १६ विनोदवीरांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केलं.

Priya More

Ekda Yeun Tar Bagha Movie:

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasya Jatra) फेम अभिनेता प्रसाद खांडेकर (Prasad Khandekar) दिग्दर्शित ‘एकदा येऊन तर बघा’ या चित्रपटाला (Ekda Yeun Tar Bagha Movie) प्रेक्षकांकडून खूप चांगली पसंती मिळाली. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली. चित्रपटातील गाणी, डायलॉग, पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले. या चित्रपटाने प्रेक्षकांना खळखळवून हसवलं. या चित्रपटामध्ये एक-दोन नाही तर तब्बल १६ विनोदवीरांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केलं. या चित्रपटाच्या यशानंतर आता त्याचा हिंदी रिमेक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे पोट धरुन हसण्यासाठी तयार राहा.

‘एकदा येऊन तर बघा’ या चित्रपटाच्या हिंदी रिमेकची नुकताच घोषणा करण्यात आली आहे. राजेश मोहंती या चित्रपटाच्या हिंदी रिमेकची निर्मिती करणार आहेत. त्यांनी सांगितले की, 'आम्ही लवकरच या विलक्षण चित्रपटाचा हिंदी रिमेक करणार आहोत. या चित्रपटाची संकल्पना फारच उत्कृष्ट आहे. ही कथा भारतीय प्रेक्षकांना नक्कीच आवडेल याची आम्हाला खात्री आहे.'

राजेश मोहंती यांनी या चित्रपटाच्या स्टारकास्टबद्दल देखील सांगितले. ते म्हणाले की, या चित्रपटासाठी आम्ही बॉलिवूडमधील काही मोठ्या कलाकारांना संपर्क केला आहे. पण अद्याप त्यांच्याकडून होकार मिळालेला नाही. त्यामुळे या चित्रपटामध्ये कोण-कोणते कलाकार दिसणार याबाबतची माहिती मी तुम्हाला आता सांगू शकणार नाही. पण आम्ही लवकरच या चित्रपटाच्या स्टार कास्टचा खुलासा करू.'

‘एकदा येऊन तर बघा’ हा मराठी चित्रपट मागच्या वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटातील फुलंब्रीकर कुटुंबीयांनी धम्माल करत प्रेक्षकांचे मनोरंजन केले. या चित्रपटामध्ये मुख्य भुमिकेत गिरीश कुलकर्णी, तेजस्विनी पंडित, प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव, ओंकार भोजने हे दमदार कलाकार आहेत. यांच्यासोबतच सयाजी शिंदे, भाऊ कदम, विशाखा सुभेदार, पंढरीनाथ कांबळे, राजेंद्र शिसातकर, वनिता खरात, शशिकांत केरकर, रोहित माने, सुशील इनामदार आदि कलाकारांची फौज चित्रपटामध्ये पाहायला मिळाली.

दरम्यान, ‘एकदा येऊन तर बघा’ हा चित्रपट ८ डिसेंबर २०२३ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ८ कोटींची बक्कळ कमाई केली होती. या चित्रपटाच्या माध्यमातून प्रसाद खांडेकरने दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवले. दिग्दर्शन केलेला हा त्याचा पहिलाच चित्रपट आहे. अशामध्ये आता या चित्रपटाचा हिंदी रिमेक येणार असल्याने प्रेक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. ते हा चित्रपट कधी भेटीला येणार याची वाट पाहत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amit Thackeray: 'हा कोणा राजपुत्राचा पराभव नसून..', निकालानंतर अमित ठाकरेंची भावनेला हात घालणारी प्रतिक्रिया

Maharashtra Assembly Election Result : मुंबई कुणाची? ठाकरे, भाजप, शिंदे कुणाचा कोणत्या मतदारसंघात उमेदवार विजयी?

Broccoli Dishes: हिवाळ्यात सुपरफुड पेक्षा कमी नाही 'ब्रोकोली', आहारात समावेश करून पाहा

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: कर्जत-जामखेडमधून रोहित पवार विजयी

Ajaz Khan : सोशल मीडियावर हवा; मात्र राजकारणात डब्बागुल,'बिग बॉस' फेम अभिनेत्याचा दारूण पराभव

SCROLL FOR NEXT