Dr. Vashishtha Narayan Singh Biography  SaamTv
मनोरंजन बातम्या

Hrithik Roshan: गणितज्ज्ञांचे पात्र हृतिक साकारणार नाही, 'हे' आहे महत्वाचे कारण

डॉ. वशिष्ट सिंह यांच्या जीवनावर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटात हृतिक रोशन हे पात्र साकारणार नसुन दुसरा अभिनेता हे पात्र साकारणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Hrithik Roshan: सध्या हिंदी चित्रपटसृष्टीत बायोपिक्सचा चांगलाच बोलबाला आहे. यामध्ये अनेक दिग्गज कलाकार, नावाजलेले खेळाडू, आपल्या देशाचे नाव उज्वल करणारे शास्त्रज्ञ, समाजसेवक यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाची मालिका सुरु आहे. या चित्रपटांना प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसादही मिळत आहे.

बॉक्स ऑफिसवर यांची कमाई चांगलीच होताना दिसत आहे. लवकरच गणितज्ज्ञ डॉ. वशिष्ट नारायण सिंह यांच्या जीवनावर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दोन- तीन वर्षांपूर्वी चित्रपटाची घोषणा करण्यात आली असून चित्रपटात मुख्य भूमिकेत हृतिक रोशन असणार असल्याचे स्पष्ट झाले होते.

पण आता चित्रपटात हृतिक रोशन हे पात्र साकारणार नसुन दुसरा अभिनेता हे पात्र साकारणार आहे. अनेक दिवसांपासून चित्रपटाची टीम बायोपिकमधील काही खास मुद्द्यांवर काम करत आहे. एक्सेल एंटरटेन्मेंटने चित्रपटाची निर्मिती केली असून चित्रपटाची कथा ऐकूनच फरहानने अख्तरने तीन मिनिटात चित्रपटासाठी होकार दिला. त्याचवेळी हृतिकनेही चित्रपटासाठी होकार दर्शवला. पण चित्रपटाचे अख्खे गणितच विस्कटले.

चित्रपटाचे दिग्दर्शक नीरज पाठक यांनी एका इंग्रजी वेबपोर्टलला माहिती दिल्याप्रमाणे, "हृतिकने चित्रपटासाठी होकार दर्शविला आणि कोर्टात चित्रपटाविरुद्ध खटला सुरु झाला. त्यामुळे चित्रपटाच्या टीमला दोन वर्ष वाट पहावी लागली होती. अखेर आम्ही ती केस जिंकलो आणि हा चित्रपट बनवण्याचे अधिकार आम्हाला मिळाले. काही वर्षांपुर्वी सुपर 30 मध्ये हृतिकने गणितज्ज्ञांचे पात्र साकारले होते. त्यामुळे चित्रपटात दुसऱ्या कलाकाराची निवड करण्यात येणार आहे."

सोबतच नीरज पाठक पुढे बोलतात, "मी एका वर्षाहून अधिक काळ चित्रपटाच्या स्क्रिप्टवर काम करत असून बिहारमध्ये सिंग यांच्या कुटुंबासह बराच वेळ घालवला आहे." अनेक चित्रपट निर्मात्यांनी वशिष्ठ नारायण सिंग यांचे भाऊ हरिश्चंद्र नारायण सिंग यांच्याशी चित्रपटाच्या हक्कांसाठी संपर्क साधला होता. त्यांना नामांकित प्रॉडक्शन हाऊसमधून चित्रपट प्रदर्शित होत असल्याने त्यांना आनंद झाला होता.

वशिष्ठ नारायण सिंह यांच्या निधनानंतर, हृतिक रोशनने देखील एक ट्विट पोस्ट केले होते, त्याने त्या पोस्टमध्ये लिहिले आहे की त्यांच्या निधनाने खूपच दुःख झाले आहे. त्यांने 15 नोव्हेंबर 2019 रोजी ते ट्विट केले होते. "आधुनिक युगात भारताने निर्माण केलेल्या सर्वात मोठ्या गणितज्ज्ञांपैकी एकाला काल आपण गमावले. हे फार लोकांना माहीत नाही. बिहारमधील एका गावात जन्मलेल्या वशिष्ठ नारायण सिंह यांनी गणितातील काही कठीण समीकरणे सोडवली. त्यांच्या निधनाने मला खूप दु:ख झाले आहे.

Edit By: Chetan Bodke

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: 'सहाव्यांदा दक्षिण पश्चिमची जनता आशीर्वाद देणार..' देवेंद्र फडणवीसांना विश्वास

Camphor Benefits: घरात कापूर पाणी शिंपडल्याने होतात अनेक फायदे!

Aus vs Tasmania: ऐकावं ते नवल! १ धाव अन् ८ फलंदाज तंबूत; ७ फलंदाज तर शून्यावर बाद

Milid Devra News : वरळीत ठाकरे Vs देशपांडे Vs देवरा सामना रंगणार ?

Vastu Shastra : घरात या गोष्टी घडणे म्हणजे सुख, शांती आणि समृद्धीचे संकेत

SCROLL FOR NEXT