Darav Darav Song Released Instagram
मनोरंजन बातम्या

Darav Darav Song Released: ‘चंद्रा’ गाणं गायलेला जयेश खरेचं नवं गाणं रिलीज, ‘नाळ २’ मधलं ‘डराव डराव’ गाणं ऐकलं का?

Naal 2 Film Song: सुधाकर रेड्डी यंकट्टी दिग्दर्शित ‘नाळ २’ मधलं दुसरं गाणं रिलीज झालं आहे.

Chetan Bodke

Darav Darav Song Out

‘नाळ’च्या अभूतपूर्व यशानंतर प्रेक्षकांच्या भेटीला ‘नाळ २’ येत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी चित्रपटाचा घोषणा करण्यात आली. तेव्हापासून प्रेक्षकांना चित्रपटाबद्दल प्रचंड उत्सुकता आहे. अशातच आता टीझरनंतर प्रेक्षकांच्या भेटीला चित्रपटातलं दुसरं गाणं रिलीज झालं आहे. सुधाकर रेड्डी यंकट्टी दिग्दर्शित ‘नाळ २’ मधलं ‘डराव डराव’ गाणं रिलीज झालं आहे.

चित्रपटातलं हे दुसरं गाणं, बच्चे कंपनीवर आधारित असून मोठ्यांवरही भुरळ टाकणारं हे गाणं आहे. चैतू, चिमू आणि मणी या तीन मित्रांची धमालमस्ती या गाण्याचे बोल वैभव देशमुख यांचे असून या गाण्याला ए. व्ही. प्रफुल्लचंद्रा यांनी संगीत दिले आहे. तर या गाण्याला जयेश खरे आणि मास्टर अवन या दोघांनी आवाज दिला आहे. याआधी प्रेक्षकांना ‘नाळ’ मधलीही गाणी फारच आवडली होती. त्याचप्रमाणे प्रेक्षकांकडून ‘नाळ २’ मधल्याही गाण्यांना उत्तम प्रतिसाद मिळतोय.

गाण्याबद्दल सांगायचे तर, या गाण्याला एका नवोदित गायकाचा आवाज लाभला आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळे कायमच आपल्या चित्रपटांमध्ये नवोदित चेहऱ्यांना संधी देतात, सोबतच त्यांना त्या संधीचे सोनं करण्याची संधी देतात. गाण्यात असे दोन चेहरे आहेत, ते म्हणजे जयेश खरे आणि चिमुकली चिमू. सध्या सारेगमपमध्ये जयेश स्पर्धक आहे. त्याने अल्पावधीतच स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्या सोबतच, गाण्यात चिमुकली चिमूने ही सर्वांचे लक्ष वेधले. तिच्या बोबड्या बोलांनी सर्वांचे लक्ष वेधले.

“आपल्या आजूबाजूला अशा अनेक व्यक्ती आहेत ज्यांच्यामध्ये कला दडलेली आहे. बऱ्याचदा ती आपल्या लक्षात येत नाही. त्यामुळे मी अशा हरहुन्नरी कलाकारांना नेहमीच संधी देतो. त्यांना प्रकाशझोतात आणण्याचा प्रयत्न करतो. विशेष म्हणजे आजवर माझी ही निवड नेहमीच योग्य ठरली आहे. अर्थात हे त्या कलाकारांचे यश. जयेश खरे त्यातलाच एक कलाकार. जयेशच्या आवाजात जादू आहे, हे आपल्या सर्वांनाच माहित आहे. त्याच्या या जादुई आवाजाने या गाण्यातूनही भावना व्यक्त होत आहेत.” गाण्याबद्दल अशी प्रतिक्रिया दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी दिली. झी स्टुडिओज आणि नागराज पोपटराव मंजुळे निर्मित ‘नाळ २’ येत्या दिवाळीत म्हणजेच १० नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rush Driving: रस्त्यावर वाहन चालवताना 'या' चुका केल्या तर नाही मिळणार विमा: सुप्रीम कोर्ट

Shocking: वॉशरूमध्ये लपून महिला सहकाऱ्यांचे VIDEO काढायचा, इन्फोसिसच्या इंजिनीअरला अटक

Nails Cutting Tips: नखं कापण्यासाठी योग्य दिवस कोणता?

कन्नड नगरपरिषदेची जुनी इमारत पत्त्यासारखी कोसळली, छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठी दुर्घटना; थरारक VIDEO

Nashik News: देव्हाऱ्याखाली दारूचा साठा सापडला, दृश्य बघून पोलिसही चक्रावले | VIDEO

SCROLL FOR NEXT