Mahesh Tilekar SAAM TV
मनोरंजन बातम्या

Mahesh Tilekar : "माणूस शून्य लोक..."; प्रसिद्ध अभिनेत्रीच्या 'त्या' वागण्यानंतर महेश टिळेकर यांचे डोळे उघडले, सांगितला खास किस्सा

Mahesh Tilekar Experience : महेश टिळेकर यांनी मुलाखतीत त्यांच्या आयुष्यातील एक किस्सा सांगितला आहे. ज्यात अभिनेत्रीला घर मिळाल्यानंतर तिच्या वागण्यात बदल पाहायला मिळतो.

Shreya Maskar

महेश टिळेकर (Mahesh Tilekar) हे प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक आणि निर्माता आहेत. त्यांनी आजवर अनेक चांगल्या कलाकृती निर्माण केल्या आहेत. त्यांनी आजवर अनेक मराठी कलाकारांसोबत काम केले आहे. त्यांच्या वाट्याला अनेक अनुभव आले आहेत. त्यातील एका अभिनेत्रीचा किस्सा महेश टिळेकर यांनी एक मुलाखतीत सांगितला आहे. नेमकं झालं काय, जाणून घेऊयात.

महेश टिळेकर यांनी लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत त्याच्यासोबत घडलेला एक प्रसंग सांगितला आहे. एका अभिनेत्रीने घर मिळाल्यावर तिने कशी वागणूक दिली याचा खुलासा त्यांनी केला आहे. महेश टिळेकर यांनी मुलाखतीत सांगितले की, "मी 2010मध्ये 12 कलाकारांना CM कोट्यातून घर मिळवून दिली. माझ्या एका सहकार्याचा फ्लॅट एका अभिनेत्रीला खूप आवडला. तो फ्लॅट चांगल्या व्ह्यूचा होता. तेव्हा मला एका अभिनेत्रीने सांगितले की मला हा फ्लॅट पाहिजे कारण घराचा नंबर माझ्यासाठी खूप लकी आहे."

पुढे महेश टिळेकर म्हणाले की, "मग मी सहकार्याशी बोलून ते घर अभिनेत्रीला मिळवून दिले. मात्र ती तिथे स्वतः राहीला आली नाही. घराचे सर्व फर्निचर करून घेतले. फक्त क्षणभर विश्रांतीसाठी मित्रांसोबत ती येथे यायची. त्यानंतर तिने तो फ्लॅट 5 वर्षांनी विकला. फ्लॅट विकताना तिला त्या व्ह्यूचे जास्त पैसे मिळाले. मग या गोष्टीची जाणीव त्या अभिनेत्रीने ठेवायला हवी ना."

शेवटी महेश टिळेकर म्हणाले," म्हणजे माझ्या सहकार्याने आपला फ्लॅट बदलून तुला दिला, त्या पडद्यामागच्या कलाकाराला काहीतरी तू द्यायला हवे ना...पण तिने असे काहीच केले नाही. मग मी तिला फोन केला. तेव्हा ती म्हणाली की, "मी त्याला चांदीचे निरांजन देणार..." अशी माणूस शून्य लोक आहेत. "

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अयोध्येतील राममंदिरावर भगवा ध्वज, काय आहे वैशिष्ट्यं ?

Local Body Election : महाराष्ट्रात घराणेशाहीचा सिक्सर,शिंदेसेनेत एकाच घरात 6 उमेदवार

'जोपर्यंत CM तोपर्यंत लाडकी बहीण योजना'; मुख्यमंत्री फडणवीसांनी योजनेबाबत दिला शब्द

Shocking: लग्नाला ३ वर्षे झाली, तरीही मुल होत नाही; टेन्शनमध्ये शक्तीवर्धक गोळ्या खाल्ल्या, तरुणासोबत भयंकर घडलं

Crime News: माध्यमिक शाळेची शिक्षिका चॅटिंग करत पाठवायची बाथरूमचे फोटो, नंतर घरी बोलवायची अन्....

SCROLL FOR NEXT