Ankush Chaudhari Look Of Shaheer Sabale Instagram @ankushpchaudhari
मनोरंजन बातम्या

Maharashtra Shahir Look: असा घडला अंकुश चौधरी... दिग्दर्शक केदार शिंदेंनी शेअर केला 'महाराष्ट्र शाहीर'मधला शाहीर साबळेंच्या भूमिकेचा प्रवास

Behind The Scene Video Of Ankush Chaudhari: अंकुश चौधरीचा शाहीर साबळे होण्यापर्यंत प्रवास या व्हिडिओमध्ये केदार शिंदे यांनी दाखविला आहे.

Pooja Dange

Ankush Chaudhari As A Shahir Sabale: 'महाराष्ट्र शाहीर' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आजोबांच्या म्हणजेच शाहीर साबळे यांच्या १०० व्या जन्मशताब्दी निमित्त त्यांचा नातू केदार शिंदे हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे. या चित्रपटामध्ये अंकुश चौधरी शाहीर साबळे यांची भूमिका साकारत आहेत. अंकुशचा या चित्रपटातील लूकमागील गोष्ट केदार शिंदे यांनी शेअर केली आहे.

केदार शिंदे यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अंकुश चौधरीचा लूक कसा बदलला हे दाखविले आहे. अंकुश चौधरीचा शाहीर साबळे होण्यापर्यंत प्रवास या व्हिडिओमध्ये केदार शिंदे यांनी दाखविला आहे. चला तर पाहूया या अंकुश चौधरीचे ट्रान्सफॉर्मेशन.

या व्हिडिओची सुरुवात अंकुश चौधरीच्या चेहऱ्याचे माप घेण्यापासून होते. त्यानंतर अंकुशच्या चेहरा शाहीर साबळेंसारखा कसा दिसेल यासाठी मेकअप दादा काय काय गोष्टी करतात हे या व्हिडीओमध्ये दाखविण्यात आले आहे. त्यांच्या रंग, त्यांचे पेहराव आणि त्यांची शैली यासगळ्यातुन शाहीर साबळे पडद्यावर दिसतात. तसेच या व्हिडिओमध्ये केदार शिंदे अंकुशला शाहीरांचे हावभाव कसे होते जे सांगताना दिसत आहेत.

अखेर सर्वांची मेहनत यशस्वी झाली आणि शाहीर साबळे आपल्या भेटीला आले. अंकुश चौधरीचा हा लूक साऱ्यांना आवडला आणि आता लवकरच आपल्याला त्यांच्या जीवनपट मोठ्या पडद्यावर पाहता येणार आहे. अंकुश चौधरीच्या रूपातील शाहीर साबळे पाहण्यासाठी सारेजण उत्सुक आहेत. तर अंकुशचे चाहते त्याला पाहण्यासाठी आतुर आहेत.

केदार शिंदे यांनी शेअर केलेल्या या व्हिडिओ त्यांनी कॅप्शन देत शेअर केला आहे. 'असा घडला अंकुश चौधरीमध्ये बदल. महाराष्ट्र शाहीर होण्याचा हा अदभुत प्रवास', असे कॅप्शन केदार शिंदे यांनी या व्हिडिओ दिले आहे.

२८ एप्रिल, २०२३ला शाहीर साबळे यांचा जीवनप्रवास सांगणार 'महाराष्ट्र शाहीर' हा चित्रपट आपल्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातील गाण्यांनी आधीच प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलेलं आहे. या चित्रपटातील गाणी ट्रेंड करत आहेत. अनेक नेटकरी तसेच सेलिब्रिटी या चित्रपटातील गाण्यांवर रील तयार करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manikrao Kokate: मोठी बातमी! रमीचा डाव उलटला, माणिकराव कोकाटेंचं कृषिमंत्री पद गेलं

Indian Railways Updates: महाराष्ट्रातील महत्त्वाच्या एक्सप्रेसची आसान व्यवस्था बदलली; प्रवास होणार आरामदायी

Ganpati Special Train 2025 : गणपतीत कोकणात जाताव? मध्य रेल्वेने मोठी घोषणा, वाचा सविस्तर

Daya Nayak: सलाम दया नायक!" 'एन्काउंटर स्पेशलिस्ट' दया नायक यांचा वर्दीतील प्रवास थांबला

Mumbai News : मुंबईतील रस्त्यावरील खड्ड्यांनी घेतले ४ बळी; समस्या कधी संपणार? वाचा स्पेशल रिपोर्ट

SCROLL FOR NEXT