Nagraj Manjule New Movie: नागराज मंजुळेंच्या नवीन चित्रपटाचं चांगभलं! मराठमोळे कुस्तीपटू खाशाबा जाधवांचा जीवनपट उलघडणार

Biopic On Freestyle Wrestler Khashaba Jadhav: नागराज मंजुळे चित्रपटाची घोषणा करणारी पोस्ट त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केली आहे.
Nagraj Manjule's Upcoming Movie Khashaba Poster Out
Nagraj Manjule's Upcoming Movie Khashaba Poster OutInstagram @nagraj_manjule

New Marathi Movie Khashaba Poster Out: दिग्दर्शक नागराज मंजुळे चित्रपटांच्या दर्जेदार विषयासाठी प्रसिद्ध आहेत. नागराज यांचे चित्रपट महाराष्ट्रातील सामाजिक परिस्थितीवर भाष्य करणारे असतात. त्यामुळे ते महाराष्ट्रातील प्रेक्षकांशी लगेच कनेक्ट होतात. म्हणूनच चित्रपटप्रेमींना नागराज यांच्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत असतात. नागराज अण्णांनी नुकतीच एका चित्रपटाची घोषणा केली आहे. चला तर मी जाणून घेऊया काय आहे त्यांच्या आगामी चित्रपटाचा विषय.

नागराज मंजुळे चित्रपटाची घोषणा करणारी पोस्ट त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केली आहे. तसेच कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ऑलम्पिकच्या इतिहासात भारताचं आणि महाराष्ट्राचं नाव गौरवाने नोंदवणाऱ्या अत्यंत प्रतिभावंत पहिलवान खाशाबा जाधवांच्या आयुष्यवर मला चित्रपट करायला मिळतोय ही माझ्यासाठी अत्यंत आनंदाची बाब आहे.

Nagraj Manjule's Upcoming Movie Khashaba Poster Out
Amitabh Bachchan Tweet: हात जोडतो... पैसे भरले, आता तरी ब्लू टिक द्या; बिग बींचं ट्वीट

फँड्री,सैराट नंतर 'खाशाबा' हा माझा तिसरा मराठी चित्रपट असेल जो मी दिग्दर्शित करतोय. जिओ स्टुडिओ, ज्योती देशपांडेंसोबत ही माझी पहिलीच फिल्म आहे. निखिल साने सर फँड्री पासून सोबत आहेतच. हा प्रवास नक्कीच रंजक आणि संस्मरणीय असेल...! चांगभलं!'

नागराज मंजुळे यांच्या पोस्टवर अनेक कमेंट येत आहेत. त्याची पोस्ट पाहून सगळेजण त्यांचे अभिनंदन करत आहेत. दरम्यान या सगळ्यात त्यांनी शेअर केलेल्या पोस्टमधील फोटो खूपच इंटरेस्टिंग आहे.

या फोटोमध्ये खाशाबा जाधव यांचा चेहरा दिसत नाही. त्याच्या फोटो सोनेरी पदक आहे.तसेच त्याच्या फोटो तडा गेली आहे. हा फोटो पाहून तुम्हाला चित्रपटामध्ये काय असले? किंवा चित्रपटामध्ये खाशाबा यांच्या जीवनातील कोणता भागावर प्रकाश टाकण्यात येणार आहे हे तुमच्या लक्षात येईल.

७ एप्रिल, २०२३ म्हणजे तीन आठवड्यापूर्वी नागराज यांचा 'घर बंदूक बिर्याणी' चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटामध्ये नागराज मंजुळे यांनी अभिनय केला होता. नागराजसह या चित्रपटामध्ये सयाजी शिंदे, आकाश ठोसर, किशोर कदम, सायली पाटील, तानाजी गालगुंडे देखील होते.

नागराज यांच्या या चित्रपटाकडून प्रेक्षकांना खूप अपेक्षा होत्या. परंतु चित्रपट प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करू शकला नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com