Jawan Prevue Theme OUT Instagram @girijaoakgodbole
मनोरंजन बातम्या

Jawan Prevue Theme : 'जवान'ची प्रिव्हयु थीम आऊट ; चित्रपट ब्लॉकबस्टर होणार... नेटकऱ्यांचं भाकीत

Jawan Prevue Theme OUT : जवान चित्रपटातील प्रिव्ह्यूचे थीम सॉंगही रिलीज झाले आहे.

Pooja Dange

Director Atlee Defines Jawan By Theme Song : 'पठान'च्या ब्लॉकबस्टर यशानंतर शाहरुख खानचा 'जवान' चाहत्यांना आश्चर्यचकित करण्यासाठी सज्ज झाला आहे. हा चित्रपट सप्टेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे. दरम्यान निर्माते किंग खानच्या या चित्रपटाशी संबंधित अपडेट्स शेअर करत आहेत.

नुकताच 'जवान'चा प्रिव्ह्यू शेअर करण्यात आला, अल्पावधीतच या व्हिडिओला 100 मिलियनहून अधिक व्ह्युज मिळाले आहेत. पॉवर पॅक्ड अॅक्शन सीन्स असलेल्या जवान चित्रपटातील प्रिव्ह्यूचे थीम सॉंगही रिलीज झाले आहे.

'जवान'ची प्रिव्ह्यू थीम रिलीज

'जवान' पाहण्यासाठी चाहते प्रचंड उत्सुक आहेत. चित्रपटाच्या स्टार कास्टमध्ये नयनतारा, सान्या मल्होत्रा, विजय सेतुपती आणि प्रियामणी यांचा समावेश आहे. दीपिका पदुकोण स्पेशल अपिअरन्स करणार आहे. (Latest Entertainment News)

काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा बहुप्रतिक्षित प्रिव्ह्यु शेअर करण्यात आला होता, त्यानंतर गाणे रिलीज करण्यात आले आहे. हे एक रॅप साँग आहे, ज्याला अनिरुद्ध रविचंदर यांनी संगीत दिले आहे. गीते राजा कुमारीने हे लिहिले आहे.

चित्रपट दिग्दर्शक अॅटली कुमार यांनी प्रिव्ह्यु गाण्याच्या थीमची झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे. इंस्टाग्रामवर हे गाणे शेअर करत अॅटलीने लिहिले आहे, "ही थीम जवानची परिभाषा सांगते! @iamsrk @gaurikhan @anirudhofficial @_gauravverma @redchilliesent #Jawan 7 सप्टेंबर रोजी हिंदी, तमिळ आणि तेलगूमध्ये जगभरात प्रदर्शित होणार आहे."

अनिरुद्ध रविचंदरने देखील प्रिव्ह्यु गाण्याची थीम देखील शेअर केली. यासोबतच त्याने संपूर्ण गाणे कुठे ऐकता येईल याची लिंकही शेअर केली आहे. प्रिव्ह्यूप्रमाणेच त्याचे थीम साँगही चाहत्यांना एक्साइट करत आहे.

चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलुगु भाषेत प्रदर्शित होणार

रेड चिलीज एंटरटेनमेंट प्रॉडक्शन हाऊसच्या माध्यमातून 'जवान' चित्रपटाची निर्मिती केली जात आहे. चित्रपटाची निर्माती गौरी खान आहे. हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. शाहरुख खान आणि एटली कुमार यांचा हा पहिलाच चित्रपट आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: अजित पवार गटाचा शिवसेनेला जोरदार धक्का; २००पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

Mumbai : एका दिवसात मुंबई दर्शन! 'ही' ७ ठिकाणं पाहिलीत तर दिवस बनेल खास

भर मंडपात नवरदेवासह नातेवाईकांना डिझेल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न! प्रेमविवाहाचा असा बदला पाहून हादरून जाईल मन

Maharashtra News Live Update: जेम्स अँड ज्वेलरी क्षेत्रात भारताला नंबर वन बनवण्याचे लक्ष्य

First car service: नवी कार घेतल्यानंतर पहिली सर्व्हिसिंग कधी केली पाहिजे?

SCROLL FOR NEXT