Kantara Poster Saam Tv
मनोरंजन बातम्या

Kantara Controversy: 'कांतारा'ची तुलना 'तुंबाड'सोबत करणाऱ्यांना आनंद गांधींनी फटकारले; ट्रोलर्सना म्हणाले…

ऋषभ शेट्टी दिग्दर्शित 'कांतारा' चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून बराच चर्चेत आहे. कधी बॉक्स ऑफिसवर केलेल्या कमाईमुळे तर कधी विवादांमुळे असा बऱ्याचदा हा चित्रपट चर्चेत राहिला आहे.

Chetan Bodke

Anand Gandhi Slams Kantara: ऋषभ शेट्टी दिग्दर्शित 'कांतारा' चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून बराच चर्चेत आहे. कधी बॉक्स ऑफिसवर केलेल्या कमाईमुळे तर कधी विवादांमुळे असा बऱ्याचदा हा चित्रपट चर्चेत राहिला आहे. 'तुंबाड' चित्रपटाचे दिग्दर्शक आनंद गांधी यांनी या चित्रपटावर तीव्र प्रतिक्रिया दिली असून विषारी मानसिकतेला प्रोत्साहन देणारा चित्रपट असल्याचे वर्णन केले आहे. सोबतच, चित्रपटातील वनदेवाची कथा अनेक प्रेक्षकांना आवडली. सोबतच चित्रपटावर कॉपीराईटचा आरोपही बऱ्याचदा लावण्यात आला आहे.

या वर्षात चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई करत 2022 मध्ये सर्वात हिट चित्रपटांपैकी एका चित्रपटाचा त्याला मान मिळाला. आता, 'तुंबाड'चे दिग्दर्शक आनंद गांधी यांनी हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाल्यानंतर पाहिला आणि याच कारणावरून चित्रपटाच्या दिग्दर्शकाची खरडपट्टी काढली आहे.

आनंद गांधींनी त्यांच्या ट्विटर हँडलवर पोस्ट करत लिहिले की, "कांतारा चित्रपट तुंबाड सारखा नाही. 'तुंबाड'मागील माझी कल्पना म्हणजे दहशतवादाचा वापर आणि अतिरेकीपणसाठी रूपक म्हणून होता. 'कांतारा' हा त्यांचा उत्सव आहे." आनंदने 'तुंबाड' हा चित्रपट बनवला, जो एक सस्पेन्स हॉरर लोककथा दाखवणारा चित्रपट होता. जरी तो बॉक्स ऑफिसवर फारसा चालला नसला तरी, देशभरात समीक्षकांनी त्याची चांगली प्रशंसा केली आहे.

मात्र, हे ट्विट व्हायरल होताच नेटकऱ्यांनी त्यावर आपल्या प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली. काहींनी आनंद गांधी यांच्याशी सहमती दर्शवली, तर नेटकऱ्यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. त्यांच्यापैकी एका नेटकऱ्याने लिहिले की, "कांतारा गुंतागुंतीच्या कथेमुळे आवडलेला नाही, तर ती खऱ्या भारतीय तुलुनाडू संस्कृतीशी संबंधित असल्यामुळे ती कथा आवडली. ज्याने हा एक असा चित्रपट बनवला जो इतरत्र कुठेही बनवू शकला नाही." कांताराच्या दिग्दर्शकाला ट्रोलिंगला सामोरे जाण्याची ही पहिलीच वेळ नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palmistry Astrology Signs: तुमच्या हातावर कमळ आहे? पैशांचा पाऊस पडणार, वाचा हस्तरेखा शास्त्र काय सांगतेय

धक्कादायक! दादर रेल्वे स्थानकात प्रवाशाचा दोनदा आत्महत्येचा प्रयत्न, VIDEO

Shocking : बेडवर ढकललं, दाराची कढी लावली, मित्रासोबतचा फोटो व्हायरल करतो सांगत अल्पवयीन मुलीवर बलात्कार, महाराष्ट्र हादरला!

Maharashtra Live News Update: छत्रपती संभाजीनगरमधून अमेरिकेतील नागरिकांची ऑनलाइन फसवणूक

Gold- Silver Price: सोनं खरेदीची सुवर्णसंधी! १ तोळा सोन्याच्या दरात ४००० रुपयांची घसरण, वाचा सुवर्णनगरीत आजचा भाव किती?

SCROLL FOR NEXT