Stree 2 Aaj Ki Raat Song  Saam Tv
मनोरंजन बातम्या

'Stree 2' Aaj Ki Raat Song: 'स्त्री 2'मध्ये 'आज की रात' गाण्याची निवड का केली? दिग्दर्शकाने केला खुलासा

stree 2 song : बॉलिवूड चित्रपटातील गाणी ही कायम प्रेक्षकांच्या मनात राहत असतात. त्यातच स्त्री २ च्या चित्रपटातल्या गाण्यामागचं सत्य समोरआलं.

Sneha Dhavale

अभिनेत्री हेलन यांचं ‘मेरा नाम चिन चिन चु’हे गाणं तुम्हाला माहित असेल. तसंच अलिकडच्या वर्षांमधल्या फिल्म मग 'दबंग'मधलं मुन्नी बदमान हूई, 'पुष्पा'मधलं 'उ आंटे', संजय लीला भन्सालींच्या' रामलीला' मधलं प्रियांका चोप्राचं ‘राम चाहे लीला’,ही सगळी आणि अशी अनेक आयटम साँग्स प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात आहेत. गेल्या दोन दशकांमध्ये तर आयटम साँग्सचा फॉर्म्युला जवळजवळ प्रत्येक चित्रपटांमध्ये वापरला जात आहे.

बॉलिवूड चित्रपटांमध्ये उडत्या चालीच्या, सेनसेशलन गाण्यांवर अभिनेत्री, आयटम गर्ल्सनी धरलेला ठेका पाहून सिनेप्रेमींना भुरळ पडली नाही तर नवलच. असे अनेक चित्रपट आहेत ज्यांचं कथानक, कलाकारांचा अभिनय आणि दिग्दर्शन अत्यंत साधारण, सुमार दर्जाचं असूनही केवळ त्यातल्या आयटम नंबरमुळं ते लक्षात राहिलेत.आयटम साँग हिट म्हणजे चित्रपट हिट असा समजही यामुळं निर्माण होऊ लागला.

अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांच्या 'स्त्री 2' मधलं 'आज कि रात मजा हुस्न का' हे आयटम साँग सध्या चर्चेत आहे. मॅडॉक फिल्मची निर्मिती असलेल्या आणि अमर कौशिक दिग्दर्शित हॉरर कॉमेडी 'स्त्री 2' बॉक्सऑफिसवर आतापर्यंतचा सर्वात मोठा ओपनर ठरला. पण तमन्नाच्या 'आज कि रात'नं एक नवी मुड तयार केला आहे. दिग्दर्शक अमर कौशिकनं या हिट आयटम ट्रॅकवर आपलं मत मांडलं आहे.

केवळ सिनेमात तडका म्हणून नाही तर 'स्त्री 2'च्या स्टोरीलाईनला साजेसं आयटम साँग असल्याचं तो म्हणतो. 'आज कि रात'या गाण्याचं बोलही सिनेमाच्या कथेमध्ये चपखल बसलेत असं अमर आवर्जून सांगतो. आयटम साँग मादक, मसालेदार असू शकते पण त्याचबरोबर त्यात विचारशीलताही वाव असू शकतो. 'आज कि रात' हेच देण्याचा आपला प्रयत्न असल्याचं अमर म्हणतो. तर मग दिग्दर्शक अमर कौशिकनं हेही सांगावं की नक्की कोणता संदेश या गाण्यातून तो देऊ पाहतोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nagpur : पिकांच्या संरक्षणासाठी तारेत सोडला विद्युत प्रवाह; चारा कापताना झाला घात, विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू

Aamhi Saare Khavayye : खुशखबर! मराठी कुकिंग शो 'आम्ही सारे खवय्ये' येतोय? पाहा VIDEO

Rave Party: रेव्ह पार्टी म्हणजे नेमकं काय?

Maharashtra Live News Update: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांची इच्छा - नितेश राणे

Masala Gobi Recipe : कोबीच्या भाजीला द्या खास ट्विस्ट, मुलं ५ मिनिटांत फस्त करतील टिफिन

SCROLL FOR NEXT