Chhaava Movie  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Chhaava Movie : विक्की कौशलच्या 'छावा' चित्रपटाची रिलीज डेट बदलली, 'या' दिवशी होणार प्रदर्शित

Chhaava Movie Release Date Update : लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'छावा' चित्रपटाची रिलीज डेट बदलण्यात आली आहे. विकी कौशलचा 'छावा' चित्रपट आता कधी प्रेक्षकांच्या भेटीला येणार जाणून घ्या.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) आणि रश्मिका मंदान्ना यांची मुख्य भूमिका असलेल्या 'छावा' चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे.  दिनेश विजन यांच्या मॅडॉक फिल्म्सने याची निर्मिती केली आहे.  अलीकडेच अशी बातमी आली होती की 'पुष्पा 2' च्या रिलीजच्या पार्श्वभूमीवर, 'छावा'च्या (Chhaava Movie) निर्मात्यांनी निर्णय घेतला आहे.  आता निर्मात्यांनी त्याची नवीन डेट रिलीज केली आहे.  हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

'छावा'ची नवीन डेट रिलीज

दिनेश विजनचा मॅडॉक फिल्म्सचा बहुप्रतिक्षित 'छावा' आता १४ फेब्रुवारी २०२५ रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे.  विकी कौशलची छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका असलेल्या ऐतिहासिक नाटकाचे दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केले आहे.  विशेष म्हणजे, १९ फेब्रुवारी २०२५ रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती असल्याने तारखेला विशेष महत्त्व आहे.  विकीने याआधी लक्ष्मण उतेकरसोबत 'जरा हटके जरा बचके' या चित्रपटात काम केले आहे, ज्यामध्ये अभिनेत्री सारा अली खान मुख्य भूमिकेत होती.

छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार विकी

'छावा'ला सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनकडून U/A 13 प्लस रेटिंग मिळाले आहे.  'छावा'मध्ये विकी कौशल एका शूर योद्धा राजाची भूमिका साकारताना दिसणार आहे. ज्याने मुघल साम्राज्य आणि मराठा साम्राज्याच्या इतर शत्रूंविरुद्ध लढा दिला. या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका अभिनेता विकी कौशल साकारत आहे. तर अभिनेत्री रश्मिका मंदान्ना येसूबाईची भूमिका साकारत आहे.  रश्मिका अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2: द रुल' या चित्रपटाचा देखील एक भाग आहे.  अक्षय खन्ना औरंगजेबाच्या भूमिकेत दिसणार आहे.

लक्ष्मण उतेकर यांना उत्सुकता

छत्रपती संभाजी महाराजांची कथा मोठ्या पडद्यावर दाखवण्यासाठी उत्सुक असल्याचे त्यांनी सांगितले होते.  एका मुलाखतीत, चित्रपट निर्मात्याने लक्ष्मण उतेकर यांनी सांगितले होते की, 'आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांवर अनेक चित्रपट पाहिले आहेत, परंतु छत्रपती संभाजी महाराज किती महान योद्धा होते आणि त्यांचे मराठा साम्राज्य व महाराष्ट्रासाठी काय योगदान होते हे कोणालाही माहिती नाही.'  या चित्रपटाची कथा डॉ. जयसिंगराव पवार यांच्या एका मराठी पुस्तकातून घेण्यात आली आहे, ज्यात संभाजीराजांच्या कारकिर्दीतील घटना आणि यशाचे वर्णन आहे.  या चित्रपटात मराठा साम्राज्याचे वैभव आणि शौर्य तसेच संभाजी महाराजांसमोरील वैयक्तिक आणि राजकीय आव्हाने दाखवण्यात येणार आहेत.

Edited by- अर्चना चव्हाण

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Soybean Side Effects : सोयाबीन कोणत्या व्यक्तींनी खाणं टाळावं?

Maharashtra Live News Update: सुषमा अंधारे अन् कुणाल कामराच्या अडचणीत वाढ; विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव मंजूर

Accident News : एकीकडे मुसळधार पाऊस, टेम्पोची दुचाकीला धडक, बायकोसमोर नवऱ्याचा अंत; भरपावसात पत्नीचा आक्रोश

Hindi Langauge Row: हिंदी सक्तीच्या जीआरची होळी प्रकरणी २५० ते ३०० जणांवर गुन्हा; आंदोलनात उद्धव ठाकरे यांचीही उपस्थिती | VIDEO

Relationship Tips : महिलांच्या मनातलं कसं ओळखायचं?

SCROLL FOR NEXT