Dipika Kakar Saam Tv
मनोरंजन बातम्या

Dipika Kakar: बिग बॉस फेम दीपिका कक्करला झाला 'हा' गंभीर आजार; पतीने अश्रू ढाळत केला खुलासा

Dipika Kakar Health Update: लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री दीपिका कक्करच्या आरोग्याविषयी चिंताजनक बातमी समोर आली आहे. तिचा पती, अभिनेता शोएब इब्राहिमने आपल्या यूट्यूब व्ह्लॉगद्वारे ही माहिती तिच्या चाहत्यांना दिली आहे.

Shruti Vilas Kadam

Dipika Kakar : लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री दीपिका कक्करच्या आरोग्याविषयी चिंताजनक बातमी समोर आली आहे. तिचा पती, अभिनेता शोएब इब्राहिमने आपल्या यूट्यूब व्ह्लॉगद्वारे ही माहिती दिली आहे की दीपिकाच्या यकृतात (लिव्हर) टेनिस बॉलच्या आकाराचा ट्युमर आढळला आहे. सध्या तिच्यावर उपचार सुरू असून, लवकरच शस्त्रक्रिया होणार आहे.

शोएबने सांगितले की, दीपिकाला काही दिवसांपासून पोटदुखीचा त्रास होत होता. सुरुवातीला त्यांनी अ‍ॅसिडिटी समजन औषधे घेतली, परंतु वेदना कमी न झाल्यामुळे त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेतला. रक्त तपासणीत यकृतात ट्युमर असल्याचे स्पष्ट झाले. CT स्कॅनमध्ये हा ट्युमर डाव्या लोबमध्ये असल्याचे दिसून आले, ज्याचा आकार टेनिस बॉलइतका मोठा आहे. सद्याच्या अहवालानुसार, हा ट्युमर सौम्य (बेनाईन) आहे.

दीपिका सध्या रुग्णालयात दाखल असून, लवकरच तिच्यावर शस्त्रक्रिया होणार आहे. शोएबने चाहत्यांना दीपिकासाठी प्रार्थना करण्याचे आवाहन केले आहे. त्याने सांगितले की, त्यांच्या मुलाला आईपासून दूर राहणे कठीण जात आहे, परंतु ते दोघेही या कठीण प्रसंगाला सामोरे जाण्यासाठी मानसिकदृष्ट्या तयार आहेत .

दीपिका कक्करने नुकतेच 'सेलिब्रिटी मास्टरशेफ इंडिया' या शोमध्ये सहभाग घेतला होता, परंतु आरोग्याच्या कारणास्तव तिने शोमधून माघार घेतली. या बातमीने तिच्या चाहत्यांमध्ये चिंता वाढली आहे, सर्वजण तिच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत. शोएब आणि दीपिका यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील या कठीण प्रसंगातही चाहत्यांशी प्रामाणिकपणे संवाद साधल्यामुळे त्यांचे कौतुक होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Atal Setu : आतापर्यंत १ कोटी ३० लाख वाहनांचा प्रवास, 'अटल सेतू'मुळे सरकारच्या तिजोरीत कोट्यवधींची भर

Digestion Tips: पचनक्रिया मजबूत ठेवण्यासाठी झोपण्यापूर्वी नक्की करा 'हे' उपाय

Bhagavad Gita: भगवद्गीतेचा सहावा अध्याय कोणती शिकवण देतो?

Ahmedabad Student Death: आदल्या दिवशी १०वीच्या मुलीने 'सैयारा' पाहिला; दुसऱ्या दिवशी शाळेच्या चौथ्या मजल्यावरून उडी घेतली

Maharashtra Live News Update: पुढच्या पिढीला माहिती होण्यासाठी कारगिल दिन साजरा केला पाहिजे

SCROLL FOR NEXT