Dipika Kakar Health Saam tv
मनोरंजन बातम्या

Dipika Kakar: सर्जरीनंतर हॉस्पिटलमधून घरी आली दीपिका कक्कर; चाहत्यांचे मानले आभार, आता कशी आहे अभिनेत्रीची तब्येत?

Dipika Kakar Health: 'ससुराल सिमर का' या टीव्ही शोमधील अभिनेत्री दीपिका कक्करची नुकतीच सिस्ट सर्जरी झाली. गेल्या मंगळवारी तिला या सर्जरीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दीपिका आता कशी आहे ते जाणून घ्या?

Shruti Vilas Kadam

Dipika Kakar Health: अभिनेत्री दीपिका कक्करने गेल्या वर्षी लिव्हरच्या कर्करोगावर यशस्वीरित्या मात केली. या आजारावर तिची एक मोठ्या सर्जरी झाली. तिच्यावर अजूनही उपचार सुरू आहेत. दरम्यान, तिला पुन्हा पोटदुखी सुरु झाली. त्यामुळे टेस्ट केल्यानंतर तिच्या पोटात १३ मिमीचा सिस्ट असल्याचे आढळून आले. गेल्या मंगळवारी तिला सर्जरीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सर्जरी यशस्वी झाली आणि ती आता घरी परतली आहे. आता दीपिकाने तिच्या आरोग्याविषयी अपडेट शेअर केले.

आता तिचा त्रास कमी झाला आहेत...

दीपिका कक्करने गुरुवारी तिच्या 'दीपिकाज वर्ल्ड' या व्लॉगमधून एक व्हिडिओ शेअर केला. त्यामध्ये तिने चाहत्यांच्या प्रार्थनांसाठी आभार मानले. अभिनेत्रीने सर्जरी यशस्वी झाल्याचे सांगितले. उपचार कसे झाले हे देखील तिने शेअर केले. तिला अचानक पोटदुखीचा त्रास होऊ लागला आणि तातडीने सर्जरी करावी लागली. दीपिकाच्या मते, सर्जरीनंतरही तिला खूप वेदना होत होत्या. पण, आता तिचा त्रास कमी झाला आहेत.

लेसर प्रॉसीजर

मंगळवारी, २४ फेब्रुवारी रोजी तिला सर्जरीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्यावर लेसर प्रक्रिया करण्यात आली. दीपिकाचा नवरा आणि अभिनेता शोएब इब्राहिमने सोशल मीडिया आणि व्हीलॉगद्वारे चाहत्यांना ही प्रक्रिया यशस्वी झाल्याची आणि दीपिका आता बरी होत असल्याची माहिती दिली. दरम्यान, दीपिकाने आता तिच्या व्हीलॉगवर एक नवीन व्हिडिओ शेअर करून चाहत्यांचे आभार मानले आहेत.

डॉक्टरांनी मला खूप धीर दिला...

दीपिका म्हणाली, "यावेळी मी रुग्णालयात गेलो तेव्हा मी खूप घाबरले होते. मला खूप पोटदुखी होत होती, पण डॉक्टरांनी खूप धीर दिला." अभिनेत्री पुढे म्हणाली, "यावेळी, शुद्धीवर आल्यानंतर, अर्धा तास माझ्या पोटात होणारा वेदना असह्य होता. पण तो वेळही निघून गेला. तुम्ही सर्वांनी माझ्यासाठी प्रार्थना केल्यात. त्याबद्दल धन्यवाद."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Actor : "मी ब्रेक घेतोय..."; मराठमोळ्या अभिनेत्याचा मोठा निर्णय, कारण वाचून धक्का बसेल

Maharashtra News Live Update: लाखोंच्या अनुदान अपहारप्रकरणी महिला तलाठी जेरबंद

South Indian banana chips: चहासोबत काहीतरी मस्त हवंय? घरच्या घरी बनवा साऊथ स्टाईल कुरकुरीत बनाना चिप्स

Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण' योजनेची नवीन नोंदणी अन् e-KYC सुरू? 'या' व्हायरल मेसेजमागचं धक्कादायक सत्य आलं समोर

Political News : दिल्लीत हालचालींना वेग! मोदींच्या कॅबिनेटमध्ये मोठा फेरबदल होणार, 'या' नेत्यांना मिळणार मोठी जबाबदारी

SCROLL FOR NEXT