Dipika Kakar saam tv
मनोरंजन बातम्या

Dipika Kakar : लिव्हर कॅन्सरनंतर दीपिका कक्करची पुन्हा तब्येत बिघडली, VIDEO शेअर करत आजाराबद्दल सांगितले

Dipika Kakar Health Issues : टिव्ही अभिनेत्री दीपिका कक्करची पुन्हा तब्येत बिघडली आहे. तिला लवकरच रुग्णालयात दाखल करणार आहेत. लिव्हर कॅन्सरनंतर दीपिकाला नेमकं काय झाले, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

दीपिका कक्करची पुन्हा तब्येत बिघडली आहे.

दीपिका कक्करला रुग्णालयात ॲडमिट करणार आहेत.

गेल्यावर्षी दीपिकाला लिव्हर कॅन्सर झाला होता.

'ससुराल सिमर का' फेम अभिनेत्री दीपिका कक्कर गेल्याकाही काळापासून आपल्या हेल्थमुळे चांगली चर्चेत आहे. जून 2025 मध्ये दीपिका कक्करने आपल्याला स्टेज-2 कर्करोग (Stage-2 cancer) झाल्याची माहिती दिली होती. दीपिकाच्या लिव्हरमध्ये टेनिस बॉलच्या आकाराचा ट्युमर होता. दीपिकाला स्टेज-2 कर्करोगाचा निदान झाल्यावर तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. दीपिका १४ तास ओटीमध्ये होती. त्यानंतर घरी आली आहे. तेव्हापासून दीपिका आपल्या हेल्थमुळे चांगली चर्चेत आहे. आता तिच्या हेल्थ संबंधित मोठी अपडेट समोर आली आहे. दीपिकाची तब्येत पुन्हा बिघडली आहे. याची माहिती दीपिका आणि तिचा नवरा शोएब इब्राहिम याने दिली आहे.

दीपिका आणि शोएबचा मोठा चाहता वर्ग आहे. ही दोघे सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. युट्यूबवर यांचे चॅनेल आहे. ज्यावर आपल्या लाइफचे अपडेट देत राहतात. नुकताच दीपिका आणि शोएबने एक व्लॉग शेअर केला आहे. ज्यात शोएबने सांगितले की, दीपिकाच्या पोटात एक लहान गाठ (सिस्ट) आहे. शोएबने सांगितल्यानुसार गेल्या काही दिवसांपासून दीपिकाची तब्येत बिघडली आहे. तिच्या पोटात आणि खांद्याला तीव्र वेदना होत आहेत. त्यामुळे तिला रुग्णालयात नेण्यात आले.

दीपिकाला डॉक्टरांनी सीटी स्कॅन करायला सांगितला. ज्यात 1.3 सेंटीमीटरची एक छोटी सिस्ट दिसून आली. बाकी सर्व रिपोर्ट्स नॉर्मल आहेत. यावर उपचारांसाठी दीपिका हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होणार आहे. शस्त्रक्रिया न करता एका छोट्या ट्रीटमेंटने सिस्ट 'बर्न' केले जाईल. ज्यासाठी दीपिकाला 3-4 दिवस रुग्णालयात रहावे लागेल.

व्हिडीओच्या शेवटी दीपिका खूपच भावुक झाली. तिने चाहत्यांना आवाहन केले की, कोणतीहे लहान दुखणे दुर्लक्ष करू नका. त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. शोएब इब्राहिम आणि दीपिका कक्कर यांनी अनेक हिट मालिकांमध्ये काम केले आहे. चाहत्यांना यांचा अभिनय खूप आवडतो.दीपिका कक्कर ही 'बिग बॉस 12' ची विजेता देखील राहिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Income Tax 2026: महत्त्वाची बातमी! 1 एप्रिलपासून घर, गाडी आणि पगाराचे नियम बदलणार, वाचा संपूर्ण माहिती

Diesel Price Hike: इराण-इस्त्रायल युद्धाचा फटका; पेट्रोलनंतर 'या' डिझेलच्या दरात मोठी वाढ

१०० हून अधिक महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या भोंदूबाबा कॅप्टन खरातच्या आणखी 'करामती'; एकापेक्षा एक कारनामे उघड

Maharashtra Live News Update: पुणे-सातारा हायवेवर धक्कादायक घटना, टेकडीवर चढून तरुणीचा उडी मारण्याचा प्रयत्न

Fake Currency Racket: अशोक खरातनंतर आणखी एका बाबाचा कारनामा उघड; आश्रमातच सुरू होताना नको 'तो' प्रकार

SCROLL FOR NEXT