Dino Morea Searching Phone At Airport Instagram @thedinomorea
मनोरंजन बातम्या

Dino Morea Spotted At Airport: अभिनेता डिनो मोरिया एअरपोर्टवर फोन मागताना झाला स्पॉट : व्हिडिओ व्हायरल

Dino Morea Searching Phone At Airport: बऱ्याच दिवसांपासून कॅमेरापासून दूर असलेला डिनो मोरिया आता पुन्हा कॅमेरात कैद झाला आहे.

Pooja Dange

Dino Moria Viral Video: बऱ्याच काळापासून लाइमलाईटपासून दूर असलेला डिनो मोरिया पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. डिनोने बॉलिवूड सोडून त्याच्या मोरच साऊथकडे वळवला आहे. साऊथच्या मल्याळम आणि तेलुगू चित्रपटामध्ये डिनो पदार्पण करणार आहे.

चॉकलेट बॉय म्हणून प्रसिद्ध असलेला डिनो खलनायक म्हणून जास्त गाजला. डिनो मोरियाने राजेश खन्ना, संजय दत्त, सुनील शेट्टी अशा बड्या कलाकारांसोबत डिनो मोरिया दिसला होता. बऱ्याच दिवसांपासून कॅमेरापासून दूर असलेला डिनो मोरिया आता पुन्हा कॅमेरात कैद झाला आहे. एका वेगळ्याच कारणाने डिनो पुन्हा चर्चेत आला आहे. (Latest Entertainment News)

नुकताच त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तो नुकताच पापाराझींच्या कॅमेरासमोर दिसला होता.या व्हिडिओत तो एअरपोर्ट वर असल्याचे दिसत आहे. एअरपोर्टवरून बाहेर येतानाच तो लोकांकडे फोन मागताना दिसत आहे. तो म्हणतो की, 'कोणाकडे फोन आहे का? मला एक फोन करायचा आहे. पापाराझी देखील डिनोची बोलणं ऐकून गोंधळून जातात आणि त्याला प्रश्न विचारू लागतात. (Celebrity)

त्यावर डिनो त्यांना म्हणतो, 'माझा फोन बंद झाला आहे.' फोन बंद झाल्याने मला ड्रायव्हरशी संपर्क करता येत नाही'. म्हणून लोकांकडे फोन मागत आहे. तर तितेच असलेल्या एक व्यक्तीने डिनोला मदत केली आणि स्वतःचा फोन त्याला वापरायला दिला. फोन बंद असल्याने डिनोने त्याच्या स्मार्ट वॉचमधून त्याच्या ड्राइव्हरचा नंबर काढला आणि ड्रायव्हवरशी संपर्क साधला.

बऱ्याच काळापासून इंडस्ट्रीतून दूर असलेला डिनो मोरिया त्याच्या नवीन चित्रपटासाठी व्यस्त असल्याच दिसत आहे. डिनो मोरियाचा नवीन 'ब्रांदा' हा मल्ल्याळम चित्रपट पुढच्या वर्षी प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. एका वृत्ताला दिलेल्या माहितीनुसार डिनोचं या चित्रपटातील पात्र हे डार्क असल्याचं म्हटलं आहे. तर 'एजेंट' या तेलगू चित्रपटामध्ये डेब्यू करणार आहे. (Movie)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: उल्हासनगरमध्ये कपड्याच्या गोडाऊनला भीषण आग

Mumbai News : बोरिवली स्टेशनवर फिल्मी स्टाईल दरोडा, ६ जणांनी लाखो रूपयांवर केला हात साफ

Marathwada Floods : बँकांनीही आवळला शेतकऱ्याभोवती फास; सरकारी बँकांचा, सावकारी कारभार, VIDEO

Cylinder Price: दसऱ्याआधी महागाईचा चटका, गॅस सिलिंडरच्या दरात वाढ, जाणून घ्या नवीन दर

Dasara Melava: बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न पूर्ण होणार? दसरा मेळाव्यात राज-उद्धव एकत्र येणार?

SCROLL FOR NEXT