Diljit Dosanjh Saam Tv
मनोरंजन बातम्या

Diljit Dosanjh: मा‍झ्याच गाण्यांवर बंदी का? ४ गाणी बॅन केल्यामुळे दिलजीत दोसांझचा संताप अनावर

Diljit Dosanjh: अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर दिलजीत दोसांझने गाण्यांवरील निर्बंधांवर नाराजी व्यक्त केली. कोल्डप्लेचा दाखला देत भारतीय कलाकारांसाठी वेगळे नियम का, असा सवालही त्याने उपस्थित केला.

Shruti Vilas Kadam

Diljit Dosanjh: भारतातच नव्हे तर जगभरात लोकप्रिय असलेला पंजाबी गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझ सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. त्याच्या गाण्यांमधील मद्यपान आणि नशेशी संबंधित शब्दांवर घेतल्या जाणाऱ्या आक्षेपांमुळे दिलजीतने जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या कॉन्सर्टदरम्यान त्याने कोणाचेही नाव न घेता टीकाकारांना प्रत्युत्तर दिले. विशेष म्हणजे, यावेळी त्याने परदेशी कलाकारांच्या गाण्यांचा दाखला देत भारतीय कलाकारांसाठी वेगळे नियम का, असा सवाल उपस्थित केला.

कोल्डप्लेचं उदाहरण दिलं

अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर परफॉर्म करणे हे आपले स्वप्न असल्याचे दिलजीतने सांगितले. यावेळी त्याने गेल्या वर्षी याच स्टेडियमवर झालेल्या ब्रिटिश रॉक बँड कोल्डप्लेच्या कॉन्सर्टची आठवण केली. कोल्डप्लेच्या गाण्यांमध्ये मद्यपान आणि नशेशी संबंधित उल्लेख असतानाही त्यांच्यावर आक्षेप घेतला जात नाही. मात्र, भारतीय कलाकाराने अशी गाणी गायली की लगेच प्रश्न उपस्थित केले जातात, असे तो म्हणाला. "कोल्डप्ले येथे येऊन 'फिलिंग ड्रंक अँड हाय' ही गाणी गातात, तेव्हा कोणालाही अडचण नसते. मलाही ते गाणे आवडते. पण जेव्हा दिलजीत तेच गातो, तेव्हा लोकांना त्रास होतो," अशा शब्दांत त्याने आपली नाराजी व्यक्त केली.

'माझा जन्म भारतातच झाला आहे'

दिलजीत पुढे म्हणाला, "लोक म्हणतात मी परदेशातून आलो आहे, पण माझा जन्म भारतातच झाला आहे, होनोलुलुमध्ये नाही. माझ्या बँडमधील सदस्यही भारतीय असून त्यांचा जन्म भारतातच झाले आहे. असे त्याने स्पष्ट केले. जगभरात पंजाबी संगीताचा प्रसार करण्यासाठी मी प्रयत्न करत आहे. कलाकाराच्या स्वातंत्र्यावर निर्बंध आणणे चुकीचे आहे. माझं उद्देश काम करणे, कर भरणे आणि भारतीय संगीताला जागतिक स्तरावर पोहोचवणे हा आहे.

चार गाण्यांवर आक्षेप; काय आहे प्रकरण?

दरम्यान, दिलजीतच्या कॉन्सर्टपूर्वी चंदीगडमधील पीजीजीसी-४६ कॉलेजचे सहयोगी प्राध्यापक डॉ. पंडित राव धरेनवर यांनी त्याच्या चार गाण्यांवर आक्षेप घेतला होता. 'पटियाला पेग', 'पंज तारा', 'जे बिछो फीम लब्बिया' आणि 'जट्ट उत्ते फायर करदा' ही गाणी सादर करू नयेत, अशी मागणी त्यांनी केली होती. या गाण्यांमधून मद्यपान, अमली पदार्थांचे सेवन आणि हिंसाचाराला प्रोत्साहन मिळू शकते, असा त्यांचा दावा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: रॅपिडोच्या विरोधात रिक्षा संघटनांचे आंदोलन; मनसेसह विविध पक्षांच्या वाहतूक सेना एकवटणार

Sunetra Pawar : सुनेत्रा पवार महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री होणार, बड्या नेत्याच्या विधानाने राजकारणात चर्चांना उधाण

Delimitation Bill : भाजपच्या बाजारात खासदारांना १५० कोटी दर, संजय राऊतांचा खळबळजनक दावा

Gold Price Today : सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 10 टक्क्यांनी भाव कोसळले; आणखी स्वस्त होणार का?

Bathroom Vastu Tips: बाथरूममध्ये वॉशिंग मशीन ठेवणं योग्य आहे का? जाणून घ्या वास्तूशास्त्र काय सांगतं? वाचा नियम

SCROLL FOR NEXT