Surabhi Jayashree Jagdish
वास्तुशास्त्रानुसार घरातील प्रत्येक वस्तू योग्य दिशेला आणि योग्य ठिकाणी ठेवणं महत्त्वाचं मानलं जातं. असं केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा राहते आणि सुख-शांती टिकून राहते, अशी मान्यता आहे. घर असो किंवा ऑफिस, तिथे वस्तू योग्य पद्धतीने ठेवल्या नसतील तर वास्तुदोष निर्माण होतो, असं वास्तुशास्त्रात सांगितलं आहे. याचा परिणाम आपल्या रोजच्या आयुष्यावरही होऊ शकतो.
घरातील प्रत्येक खोलीपासून ते किचन आणि बाथरूमपर्यंत वास्तुशास्त्राचे काही नियम आहेत. या नियमांचं पालन केल्यास आयुष्यातील अनेक अडचणी कमी होण्यास मदत होते, असं मानलं जातं. आज आपण बाथरूमशी संबंधित काही महत्त्वाचे वास्तुनियम जाणून घेणार आहोत. अनेकांच्या मनात एक प्रश्न असतो की बाथरूममध्ये वॉशिंग मशीन ठेवणं योग्य आहे का?
घरात जागा कमी असेल तर अनेक जण बाथरूममध्येच वॉशिंग मशीन ठेवतात. काही जण सोयीसाठीही हा पर्याय निवडतात. पण वास्तुशास्त्रानुसार, बाथरूममध्ये वॉशिंग मशीन ठेवता येते का, असा प्रश्न अनेकांना पडतो.
वास्तुशास्त्रानुसार बाथरूममध्ये वॉशिंग मशीन ठेवण्यास हरकत नाही. पण ती कोणत्या दिशेला ठेवली आहे, हे महत्त्वाचं आहे. वास्तुशास्त्राच्या नियमानुसार, वॉशिंग मशीन नेहमी उत्तर-पश्चिम किंवा दक्षिण-पूर्व दिशेला ठेवावी.
या दोन दिशांव्यतिरिक्त इतर दिशेला वॉशिंग मशीन ठेवल्यास वास्तुदोष निर्माण होऊ शकतो, असं मानलं जातं. त्याचप्रमाणे मळलेले कपडे धुण्यासाठी उत्तर-पश्चिम दिशा योग्य मानली जाते. त्यामुळे बाथरूममध्ये वॉशिंग मशीन ठेवताना या दिशांची काळजी घ्यावी. या नियमांचं पालन केल्यास घरात नकारात्मक ऊर्जा येत नाही, अशी वास्तुशास्त्रात मान्यता आहे.
बाथरूमच्या रंगाबाबतही वास्तुशास्त्रात काही नियम सांगितले आहेत. घरातील प्रत्येक खोलीचा रंग वास्तुनियमांनुसार निवडल्यास घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते, असं मानलं जातं. बाथरूममध्ये नकारात्मक ऊर्जा येण्याची शक्यता जास्त असते, अशी वास्तुशास्त्रात मान्यता आहे. त्यामुळे बाथरूमचा रंग निवडतानाही विशेष काळजी घ्यावी.
वास्तुशास्त्रानुसार बाथरूमसाठी हलका निळा किंवा आकाशी रंग योग्य मानला जातो. त्यामुळे बाथरूमला रंग देताना या हलक्या रंगांची निवड करावी, असं सांगितलं जातं.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती वास्तू शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.