DilJit Dosanjh  Yandex
मनोरंजन बातम्या

Diljit Dosanjh : 'हजारों जवाबों से मेरी...'; दिलजीत दोसांझच्या गुवाहाटी कॉन्सर्टमध्ये मनमोहन सिंग यांच्या 'त्या' शायरीमुळे चाहते भावुक

Diljit Dosanjh Concert : २९ डिसेंबर रोजी दिलजीत दोसांझने गुवाहाटीमध्ये कॉन्सर्ट सादर केला. यावेळी त्यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची आठवण काढली आणि त्यांच्यासाठी जुनी शायरी सादर केली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Diljit Dosanjh : दिलजीत दोसांझचा भारत दौरा 'दिल-लुमिनाटी' अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. दिलजीतने 29 डिसेंबर रोजी गुवाहाटी येथे त्याचा कॉन्सर्ट सादर केला. पंजाबी गायक आणि बॉलीवूड अभिनेता दिलजीतने हा कॉन्सर्ट माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना समर्पित केला. दिवंगत माजी पंतप्रधानांची आठवण काढत त्यांने कॉन्सर्टमध्ये त्यांच्यासाठी शायरी ऐकवल्या.

त्याने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो माजी पंतप्रधानांना श्रद्धांजली वाहताना दिसला आहे. त्यांने मनमोहन सिंग यांचे प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून वर्णन केले आणि त्यांची एक कविता ऐकवली. दिलजीत दोसांझ म्हणतो, 'आजचा कॉन्सर्ट माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना समर्पित आहे. आयुष्यभर ते अतिशय साधे जीवन जगले. त्यांनी कधीही कोणाला उत्तर दिले नाही किंवा कोणाबद्दल वाईट बोलले नाही, त्यांच्यासारख्या व्यक्तीला राजकीय कारकीर्दीत टिकून राहणे खूप कठीण होते.

मनमोहन सिंग यांच्याकडून प्रेरणा घ्या असे सांगितले

यानंतर त्यांनी मनमोहन सिंग यांची एक शायरी सादर केली, ‘हजारों जवाबों से मेरी खामोशी अच्छी, न जाने कितने सवालों की आबरू ढक लेती है’'. हे आजच्या तरुणांनी शिकायला हवे असे तो म्हणाला. दिलजीत दोसांझ पुढे म्हणतो, 'कोणी आमच्याशी कितीही वाईट बोलले किंवा आमची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला तरी तुमचे ध्येय स्पष्ट असले पाहिजे. तुम्ही तुमच्या कामावर लक्ष केंद्रित केले पाहिजे कारण जी व्यक्ती तुमच्याबद्दल वाईट बोलत आहे तुम्ही त्याच्या बोलण्यावर कशी प्रतिक्रिया देता यावरून तुमची परीक्षा होत आहे.

गायकाच्या पोस्टवर अनेक चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. दिलजीत दोसांझचे कौतुक करताना एका चाहत्याने लिहिले, ' एकच हृदय आहे, पाजी, तुम्ही किती वेळा जिंकणार? प्रेम म्हणजे प्रेम, आदर म्हणजे आदर! मला तर रडूच आलं' त्याचवेळी आणखी एका चाहत्याने 'एपी ढिल्लनला अप्रत्यक्ष उत्तर' अशी कमेंट केली. मधल्याकाळात एपी ढिल्लनसोबत दिलजीतचा वाद झाला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPS Anjana Krushna: IPS अंजना कृष्णा याचं काय चुकलं? ठाकरेंच्या नेत्याचा अजित पवारांना सवाल

Red Fort History: ऐतिहासिक लाल किल्ल्याचे बांधकाम किती दिवसांमध्ये पूर्ण झाले?

Pitru Paksha 2025 : पितृंचे तर्पण करताना लक्षात ठेवा हे नियम

'ही शान कुणाची, लालबागच्या राजाची!' मंडपाबाहेर येताच देशभक्तीवर गाणं वाजलं, भाविकांच्या अंगावर काटा अन् डोळ्यात अश्रू

Akshay Kumar: अक्षय कुमारचा दिलदारपणा; पूरग्रस्तांना केली ५ कोटींची मदत, म्हणाला 'ही माझी...

SCROLL FOR NEXT