Sonakshi - Zaheer : सोनाक्षी-झहीर रूममध्ये एकटे असताना कोण डोकावत होतं खिडकीतून? Video व्हायरल

Sonakshi Zaheer Video : सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल हे बॉलीवूडमधील सर्वाधिक चर्चेत असलेले कपल आहेत. दोघांचेही याच वर्षी जूनमध्ये लग्न झाले. सध्या सोनाक्षी तिचा पती झहीर इक्बालसोबत ऑस्ट्रेलियात सुट्टी घालवत आहे.
Sonakshi Sinha And Zaheer Iqbal
Sonakshi Sinha And Zaheer IqbalInstagram @aslisona
Published On

Sonakshi - Zaheer : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सिन्हा आणि झहीर इक्बाल हे बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय जोडपे आहेत. आजकाल, बॉलीवूडची 'दबंग गर्ल' सोनाक्षी तिचा पती झहीर इक्बालसोबत ऑस्ट्रेलियात सुट्टी घालवत आहे, परंतु एका पाहुण्याने या कपलच्या रोमँटिक सुट्टीत व्यत्यय आणला. या कपलने त्यांच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आणि या पाहुण्याने त्यांची सकाळची झोप कशी खराब केली हे दाखवले.

सोमवारी सकाळी सोनाक्षी सिन्हा आणि झहीरने त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीजवर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये ते एका काचेच्या घरात त्यांच्या बेडवर ब्लँकेटमध्ये बसलेले दिसत आहेत. तेवढ्यात एक सिंह येतो आणि काचेसमोर गर्जना करू लागतो. अभिनेत्रीच्या पतीने आपल्या फोनद्वारे सोनाक्षीचा एक व्हिडिओ बनवला आहे ज्यामध्ये ती सिंहाची गर्जना रेकॉर्ड करताना दिसत आहे. हा व्हिडिओ तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर करताना अभिनेत्रीने लिहिले की, 'सकाळी ६ वाजताचा अलार्म'.

Sonakshi Sinha And Zaheer Iqbal
Swapnil Joshi : निर्माता आणि अभिनेता म्हणून २०२४ सगळ्यात जास्त कमाई करणारा कलाकार ठरला स्वप्नील जोशी !

गेल्या रविवारी या कपलने एक व्हिडिओ शेअर केला होता ज्यामध्ये ते सिंह आणि सिंहिणीला जवळून पाहताना दिसत होते. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, 'या दोघांसोबत'. या फोटोसह, त्याने पार्श्वभूमीत बिली आयचनरचे डिस्ने ब्लॉकबस्टर 'द लायन किंग' मधील लोकप्रिय गाणे 'द लायन स्लीप्स टुनाईट' पोस्ट केले होते.

Sonakshi Sinha And Zaheer Iqbal
Kangna Ranaut : 'यामी गौतमपेक्षा सुंदर...' ; कंगना राणौतने केले हिमाचलच्या महिलांचे कौतुक

दोघांच्या लग्नावरून वाद

सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांचे जून २०२४ मध्ये लग्न झाले होते. या जोडप्याने त्यांच्या घरी मोठ्या थाटामाटात नोंदणीकृत विवाह केला. अलीकडेच कुमार विश्वास यांनी त्यांच्या लग्नावर आक्षेपार्ह टिप्पणी केली होती, ज्यानंतर त्यांचे वडील शत्रुघ्न सिन्हा यांनी सडेतोड उत्तर दिले होते. आपली मुलगी सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बालसोबतच्या नात्याला आपला पूर्ण पाठिंबा असल्याचं त्याने आपल्या पोस्टच्या माध्यमातून स्पष्ट केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com