Diljit Dosanjh 
मनोरंजन बातम्या

Diljit Dosanjh : दिलजीत दोसांझला पुन्हा एक नोटीस; गाऊ शकणार नाही दारू विषयी गाणी...

Diljit Dosanjh : चंदीगडच्या बाल हक्क समितीने गायक दिलजीत दोसांझला नोटीस बजावली. बाल आयोगाने दिलजीतला दारू, ड्रग्ज आणि हिंसाचाराला प्रोत्साहन देणारी गाणी न गाण्याचे आवाहन केले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Diljit Dosanjh : प्रसिद्ध पंजाबी गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझ वेगवेगळ्या शहरांमध्ये लाइव्ह कॉन्सर्ट करत आहेत. आतापर्यंत त्याने भारतासह परदेशात विविध ठिकाणी त्याचा लाईव्ह कॉन्सर्ट केला आहे. लवकरच त्याचा चंदीगडला कॉन्सर्ट होणार होता. पण याआधीही 'चंदीगड कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राइट्स'च्या अध्यक्षा शिप्रा बन्सल यांनी अशा कार्यक्रमांमध्ये मुलांच्या सुरक्षिततेबद्दल आणि आरोग्याबाबत चिंता व्यक्त दिलजीत दोसांझला नोटीस पाठवली आहे.

दिलजीत दोसांझच्या चंदीगड कॉन्सर्टपूर्वी शिप्रा बन्सल म्हणाली, 'आमच्या लक्षात आले आहे की कॉन्सर्टदरम्यान मुलांना स्टेजवर बोलावले जाते. हा आवाज लहान मुलांसाठी हानिकारक आहे. रात्री उशिरापर्यंत कॉन्सर्ट चालतात आणि त्यामध्ये दारूचा पुरवठा होण्याची शक्यता असते. १८ वर्षाखालील मुलांना अल्कोहोल देऊ नये.कॉन्सर्टच्या पार्श्वभूमीवर आम्ही एक सल्लाही जारी केला आहे. आमच्या लक्षात आले आहे की दिलजीतच्या शेवटच्या कॉन्सर्टमध्ये मुलांना स्टेजवर बोलावण्यात आले होते.

शिप्रा बन्सल पुढे म्हणाल्या, काही वेळा काही गाणी वाजवली जातात जी मुलांसाठी चांगली नसतात. यामध्ये पटियाला पेग, ‘५ तारा’ आणि ‘केस’ सारखी गाणी गाणे टाळा. दारू, ड्रग्ज आणि हिंसाचार यांना प्रोत्साहन देणारे शब्द त्यात वापरले गेले असावेत. ही गाणी संवेदनशील वयात मुलांवर प्रभाव टाकतात.

हैदराबाद कॉन्सर्टपूर्वी देखील मिळाली होती नोटीस मिळाली

दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टवरूनही वाद निर्माण होत आहेत. याआधी गाण्यातील अल्कोहोल या शब्दावर आक्षेप घेण्यात आला होता, त्यानंतर दिलजीतने गाण्याचे बोल बदलले. तो १० शहरांमध्ये 'दिल-लुमिनाटी' टूर करत आहे. त्याच्या हैदराबाद शोपूर्वी तेलंगणा सरकारकडून नोटीस आली होती. नोटीसमध्ये त्याला कार्यक्रमात दारू, ड्रग्ज किंवा हिंसाचाराला प्रोत्साहन देणारी गाणी न गाण्याचा सल्ला देण्यात आला होता. या नोटीसमध्ये दिलजीतला कॉन्सर्टदरम्यान 'मुलांचा वापर' करू नका, असा इशाराही देण्यात आला आहे. याशिवाय कॉन्सर्टमध्ये मोठा आवाज आणि चमकणारे दिवे मुलांसाठी घातक ठरू शकतात, असे सांगण्यात आले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑर्डर ऑफ द रिपब्लिकने सन्मानित

Badlapur Firing : बदलापूर गोळीबार प्रकरणाला नवं वळण; गाळीबारामागे शिवसेना पदाधिकाऱ्याचा हात?

Eknath Shinde : 'जय गुजरात'च्या घोषणेनंतर एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण, उद्धव ठाकरेंचा VIDEO दाखवत विरोधकांना प्रत्युत्तर

DR. MC Dawar Death : आधी २ रुपये, आता २० रुपयांमध्ये करायचे उपचार; गरीबांचे डॉक्टर पद्मश्री एमली डावर काळाच्या पडद्याआड

Maharashtra Politics: सुषमा अंधारे अन् कुणाल कामराच्या अडचणीत वाढ; विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव मंजूर

SCROLL FOR NEXT