diljit dosanjh and Pushpa 2 Saam Tv
मनोरंजन बातम्या

Diljit Dosanjh : दिलजीत दोसांझवर चढला 'पुष्पा भाऊ'चा रंग; कॉन्सर्टमध्ये म्हणाला, 'जब साला नहीं झुकेगा...

Diljit Dosanjh : दिलजीत दोसांझने त्याच्या चंदीगड कॉन्सर्टमध्ये 'पटियाला पेग', 'केस', 'पंज तारा' सारखी गाणी न गाण्यास सांगण्यात आले होते, परंतु सीसीपीसीआरच्या अध्यक्षा शिप्रा बन्सल यांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करून दिलजीत दोसांझने ही गाणी गायली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Diljit Dosanjh : प्रसिद्ध पंजाबी गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टबाबत यापूर्वी बरेच वाद झाले होते. १४ डिसेंबरला कडक निर्बंध लावून त्याला चंदीगडमध्ये कॉन्सर्ट करण्याची परवानगी दिली. परंतु, चंदीगड बाल हक्क संरक्षण आयोगाने त्याला लाइव्ह शोमध्ये अल्कोहोल किंवा ड्रग्जशी संबंधित गाणी न गाण्याचे आदेश दिले. पण या आदेशाचे उल्लंघन करून दिलजीत दोसांझने सुरूवातीलाच 'पंज तारे' आणि 'ठेके उठे तर्या नी' ही गाणी गाऊन आयोगाच्या सल्ल्याचा अवमान केला.

दिलजीत दोसांझने कॉन्सर्टमध्ये बंदी असलेली गाणी गायली. अल्कोहोलशी संबंधित गाण्यांचा लहान मुलांवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो, असे आयोगाचे मत होते. सीसीपीसीआरच्या अध्यक्षा शिप्रा बन्सल यांनी त्यांना 'पटियाला पेग' आणि 'पंज तारा' सारखी गाणी गाण्यापासून रोखले होते, दिलजीत दोसांझने निर्बंध झुगारून निषिद्ध असलेली गाणी गायली.

विश्वविजेता गुकेशच्या नावाने चंदीगड शो आयोजित...

दिलजीत दोसांझने आपला चंदीगड शो वर्ल्ड चॅम्पियन गुकेशच्या नावावर समर्पित केला, ज्याने बुद्धिबळ विश्वचषक जिंकून देशाचा गौरव वाढवला. माहिती नुसार दिलजीत दोसांझने सांगितले की, गुकेशने वर्ल्ड चॅम्पियन बनण्याचे स्वप्न पाहिले होते, जे त्याने पूर्ण केले. त्यांनी आपल्या त्रासांचा उल्लेख केला, ज्याचा त्यांना दररोज सामना करावा लागतो. या कॉन्सर्ट दरम्यान त्याने त्यांचे एक नवीन गाणे रिलीज केले आहे, ज्याची खूप चर्चा आहे. चंदीगड कॉन्सर्टच्या आधी हैदराबादच्या कॉन्सर्टमध्ये गायकाला सल्ला मिळाला होता, ज्याला त्याने स्वतःच्या शैलीत गाऊन प्रतिसाद दिला. 'पुष्पा'च्या स्टाईलमध्ये डायलॉग्स बोलताना तो म्हणाला 'जब साला नहीं झुकेगा, तो जीजा झुक जाएगा?'

दिलजीत दोसांझला निहंगांचा आदेश...

दिलजीत दोसांझला निहंग बाबा धरम सिंग अकाली यांनी यापूर्वीच अश्लील, दारूशी संबंधित गाणी न गाण्याच्या सूचना दिल्या होत्या. हुतात्मा सप्ताहा दरम्यान जर कोणी ड्रग्ज, दारूचे सेवन केले किंवा अश्लील गाणी गायली तर त्यांना धडा शिकवला जाईल, असा इशारा निहंगांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs AUS : कोहली-रोहितची आज अग्निपरीक्षा, पर्थमध्ये पहिला वनडे, वाचा प्लेईंग ११ अन् सर्वकाही

Success Story: रिलस्टार ते डेप्युटी कलेक्टर! दुसऱ्या प्रयत्नात केली MPPSC क्रॅक; हर्षिता दवे यांचा प्रवास

Maharashtra Live News Update : नगरमधील पॅथॉलॉजिकल लॅबचे तज्ञ डॉक्टरांवर गंभीर गुन्हे दाखल

राज ठाकरे राजकारणातील नापास माणूस; अजित पवारांच्या पायाची धूळ, सदावर्तेंनी पुन्हा डिवचलं

Smriti Mandhana Marriage: स्मृती मानधनाचं ठरलं! कोणाशी बांधणार लगीनगाठ?

SCROLL FOR NEXT