Mismatched Season 3 : रोहित सराफ आणि प्राजक्ता कोळीच्या प्रेमाचा नवा चॅप्टर...

Mismatched Season 3 : प्राजक्ता कोळी आणि रोहित सराफच्या मिसमॅच वेब सीरिजचा तिसरा सीझन नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला असून या भागाची सोशल मीडियावर्मत्य अप्रमाणात चर्चा सुरु आहे.
रोहित सराफ आणि प्राजक्ता कोळीच्या प्रेमाचा नवा चॅप्टर...
mismatched season 3Yandex
Published On

Mismatched Season 3 : लोकप्रिय रोमँटिक ड्रामा वेब सिरीज 'मिसमॅच' बहुप्रतिक्षित तिसऱ्या सीझन नेटफ्लिक्स या ओटीटी माध्यमावर प्रदर्शित झाला आहे. या सीझनमध्ये फेमस इन्फ्लुएन्सर प्राजक्ता कोळी, चॉकलेट बॉय रोहित सुरेश सराफ, विहान सामत, अहसास चन्ना आणि मुस्कान जाफरी यांचा समावेश आहे. या तिसऱ्या सीझनमध्ये अधिक ट्विस्ट आणि रोमँटिक जेस्चर पाहायला मिळणार आहे.

'मिसमॅच' या वेब सिरीजचा सीझन ३ हा १३ डिसेंबर रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज झाला आहे. चाहत्यांना हा नवीनसीझन आवडत असून या भागाच्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहेत. सीझन ३ मध्ये प्रेक्षकांना रोहित सराफ आणि प्राजक्ता कोळीच्या प्रेमकथेचा एक रोमांचक नवीन पर्व पाहणार आहे.

रोहित सराफ आणि प्राजक्ता कोळीच्या प्रेमाचा नवा चॅप्टर...
Kangana Ranaut : कंगनाने रनौतचे बॉलिवूड विरोधात वादग्रस्त विधान ; बॉलीवूडवाले अनाथ म्हणूनच…

अशी आहे सीझन ३ ची कथा

सीझन ३ तीन वर्षांनंतरचा भाग दाखवत आहेत. यामध्ये ऋषी आणि डिंपल लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये राहतात. नंदिनी (दीपनीता शर्मा) चालवलेल्या NNIT मध्ये निवड न झाल्यामुळे डिंपल दु:खी आहे, तर ऋषी हैदराबादमधील संस्थेत काम करत आहे. खूप दिवसांच्या प्रतीक्षेनंतर, डिंपल कालांतराने सिड सरांच्या (रणविजय सिंघल) संस्थेत सामील होण्यासाठी हैदराबादला जाते.

रोहित सराफ आणि प्राजक्ता कोळीच्या प्रेमाचा नवा चॅप्टर...
Vikrant Massey :12th फेल फेम अभिनेता विक्रांत मेस्सीचा खुलासा; अभिनयातून ब्रेक घेण्याचं 'हे' आहे खरं कारण...

मोठ्या भांडणाच्या शेवंतानंतर हे कापल पुन्हा एकत्र आले. 'मिसमॅच' या शोमध्ये एका जोडप्याच्या प्रवासाचे सुंदर चित्रण करण्यात आले आहे, जे त्यांच्या परिस्थितीमुळे आणि वैयक्तिक स्वप्नांमुळे एकमेकांकडे आकर्षित होतात. ज्या जगात AI आणि व्हर्च्युअल रिॲलिटी आपलं लक्ष वेधून घेतात अशा जगात खऱ्या प्रेमाचे महत्व सांगणारी ही वेब मालिका आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com