Kangana Ranaut : कंगनाने रनौतचे बॉलिवूड विरोधात वादग्रस्त विधान ; बॉलीवूडवाले अनाथ म्हणूनच…

Kangana Ranaut : कपूर कुटुंबीयांनी राज कपूर यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर कंगना रनौतने वादग्रस्त विधान केले आहे.
kangana ranaut
kangana ranautSaam Tv
Published On

Kangana Ranaut : बॉलिवूडची क्वीन कंगना रनौतने ही अभिनयासोबतच तिच्या वादग्रस्त विधानांसाठी प्रसिद्ध आहे. कंगना बॉलिवूडवर टीका करण्यात कधीच कमी पडत नाही. आता कंगनाने कपूर परिवाराने पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटल्यावर देखील टिकात्मक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.याचसोबत, बॉलिवूड इंडस्ट्री अनाथ असल्यासाचेही तिने म्हटले आहे. राज कपूर यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने कपूर कुटुंबाने काही दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदींची भेट घेतली होती. यानंतर कंगना रनौतची प्रतिक्रिया समोर आली आहे. काय म्हणाली कंगना जाणून घेऊया.

कंगना रनौतने व्यक्त केले मत

एका मुलाखतीमध्ये मत व्यक्त करताना कंगना रनौत म्हणाली, मला असे वाटते की बॉलिवूडला मार्गदर्शनाची गरज आहे. आपले पंतप्रधान असो किंवा इतर कोणतेही मार्गदर्शक असो, माहिती आणि प्रसारण मंत्रालय असो बॉलिवूडला थोडं मार्गदर्शन मिळालं पाहिजे. मी सुद्धा २० वर्षांपासून बॉलीवूडमध्ये काम करत आहे. माझ्या मते हा बॉलीवूडवाले अनाथ आहेत आणि त्यांना मार्गदर्शनाची गरज आहे. त्यांना कुठे गेले पाहिजे कोणाला भेटले पाहिजे याबद्दल काहीच समजत नाही. कोणत्या इव्हन्टमध्ये जास्त पैसे मिळाले की कोणत्याही कार्यक्रमात जाऊन हजेरी लावतात. मग त्या कुप्रसिद्धी असलेल्या दाऊदच्या पार्ट्या असल्यातरी ते तिथे जातात. अनेक वेळा ते हवाला-ड्रग्स प्रकरणात अडकले आहेत.

यांना असे वाटते की पंतप्रधानांची भेट घेतली म्हणजे आपले पंतप्रधान आमचे काम पाहत असतील. पंतप्रधानांना आमच्या विषयी माहिती असेल तर नक्कीच आम्ही चांगले काम करत आहोत. पण असं नाही आहे. आमची फक्त इंडस्ट्री मोठी आहे पण तिथे रिस्पेक्टची कमतरता आहे. मी स्वतः पंतप्रधानांना भेटण्याची विनंती केली आहे, लवकरच ते मला भेटतील अशी आशा आहे’ असे कंगना पुढे म्हणाली.

kangana ranaut
Vikrant Massey :12th फेल फेम अभिनेता विक्रांत मेस्सीचा खुलासा; अभिनयातून ब्रेक घेण्याचं 'हे' आहे खरं कारण...

पंतप्रधान मोदींनी काढली राज कपूर यांची आठवण

आज १४ डिसेंबर म्हणजेच दिवंगत अभिनेते राज कपूर यांची १०० वी जयंती आहे. राज कपूर यांच्या जयंतीनिमित्त कपूर कुटुंबीयांनी काही दिवसांपूर्वी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. यावेळी पीएम मोदींनी राज कपूर यांची आठवण काढली. यासोबतच राज कपूर यांच्या भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानाबाबत पंतप्रधानांनी एक्सवर लिहिले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लिहीले, ‘आज आम्ही महान राज कपूर, एक दूरदर्शी चित्रपट निर्माता, अभिनेता आणि शाश्वत शोमन यांची १०० वी जयंती साजरी करत आहोत. त्यांच्या प्रतिभेने अनेक पिढ्याना प्रेरणा दिले आहे. भारतीय आणि जागतिक चित्रपटसृष्टीवर त्यांनी छाप सोडली आहे.’पंतप्रधानांनी अलीकडेच कपूर कुटुंबातील सदस्यांची भेट घेतली, राज कपूर यांनी अनेक यशस्वी अभिनेते निर्माण केले आहेत, त्यांचा वारसा साजरा केला पाहिजे’. असे लिहून पंतप्रधान मोदीं खास नोट शेअर केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com