Singer Trolled for Live Performance Saam tv
मनोरंजन बातम्या

Singer Trolled for Live Performance: प्रसिद्ध गायिकेचे लाईव्ह कॉन्सर्टवेळी अश्लील चाळे; स्टेजवरील कृत्याने चाहते संतापले, VIDEO

Singer Trolled for Live Performance: 'धुरंधर' गायिका जस्मिन सँडलसने नुकतेच अहमदाबादमध्ये एका कॉन्सर्टमध्ये एक अश्लिलपणा केला. गाण्याऐवजी, जस्मिनने लिप-सिंक केले आणि स्वतःवर पाणीही ओतले. यामुळे चाहते संताप व्यक्त करत आहेत.

Shruti Vilas Kadam

Singer Trolled for Live Performance: 'धुरंधर' मध्ये आपल्या दमदार आवाजाने सर्वांना मंत्रमुग्ध करणारी गायिका जस्मिन सँडलस वादात सापडली असून, तिला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात येत आहे. 'धुरंधर'मध्ये दमदार गाणी सादर करणाऱ्या या गायिकेला लाईव्ह परफॉर्ममध्ये ऐकण्यासाठी चाहते उत्सुक होते. मात्र, या लाईव्ह परफॉर्ममध्ये जे घडले त्यामुळे चाहते संतापले आहेत.

जस्मिन सँडलसने कॉन्सर्टमध्ये लिप-सिंक केले

खरं तर, लाईव्ह गाण्याऐवजी जस्मिन सँडलस आधीच रेकॉर्ड केलेल्या गाण्यांवर लिप-सिंक करताना दिसली. इतकंच नाही, तर 'शरारत' गाण्याच्या परफॉर्मन्सदरम्यान तिने बाटलीतून स्वतःवर अश्लिल प्रकारे पाणी ओतून नाचायला सुरुवात केली. ही गोष्ट लोकांना अजिबात आवडली नाही. कॉन्सर्टमधील एक व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर समोर आली आहे, ज्यामध्ये जस्मिन सँडलस लेहेंगा-चोली घालून 'शरारत' गाण्यावर नाचताना दिसत आहे. पण यावेळी ती गात नसून लिप-सिंक करत होती आणि त्यानंतर तिने स्वतःवर पाणी ओतून घेतलं.

जस्मिन सँडलसवर युजर्स संतापले

कॉन्सर्टमध्ये उपस्थित लोकांना जास्मिनचा परफॉर्मन्स आवडला असला तरी, काहींनी गायिकेच्या लिप-सिंकिंगवर आक्षेप घेतला. एका युजर्सने लिहिले, "हा काय मूर्खपणा आहे?" दुसऱ्याने लिहिले, "लिप-सिंक का?" आणखी एकाने म्हटले, "हे लोक लाईव्ह कॉन्सर्टमध्ये पण गात नाहीत." आणखी एका युजर्सने कमेंट केली, "हा काय अश्लिल प्रकार आहे. काय गरज पाणी स्वत:वर ओतायची, हिला कोणी तरी बादलीतून पाणी आणून द्या.

जास्मिन सँडलसने चाहत्यांना फसवले!

जास्मिन सँडलसकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नसली तरी, युजर्स नाराज आहेत. जास्मिन कॉन्सर्टमध्ये गाण्याच्या फक्त काही ओळी गात होती आणि बाकी सर्व लिप-सिंकिंग होते. हे पाहून, अनेक युझर्सनी जास्मिनच्या गाण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि विचारले की ती खरंच सुरात गाते की फक्त लिप-सिंकिंग करते?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

तामिळनाडूत शिवसेना स्टाईल बंड, अम्माच्या पक्षात उभी फूट

नवरा-बायकोमधील वाद टोकाला भिडला,पतीनं पत्नीचा गळा चिरला अन्...; दुहेरी हत्याकांडानं नांदेड हादरलं

मोदींच्या आवाहनाविरोधात पवार-ठाकरे आक्रमक, 'चुका तुमच्या आणि भुर्दंड जनतेला का?'

Maharashtra News Live Update: - महागडा मोबाईल नदीपात्रात पडला, थेट गोताखोरांना बोलावून मध्यरात्री राबवली शोधमोहीम

Cranberries Benefits: क्रेनबेरीज खाण्याचे जबरदस्त फायदे; शरीर निरोगी ठेवण्यासाठी 'हे' फळ आहे सुपरफूड

SCROLL FOR NEXT