Famous Singer saam tv
मनोरंजन बातम्या

Famous Singer : "हाच माझा जोडीदार..."; प्रसिद्ध गायिकेने Live कॉन्सर्टमध्ये दिली प्रेमाची कबुली, होणाऱ्या नवऱ्यासोबत केला रोमँटिक डान्स |VIDEO

Singer Engagement Announcement : प्रसिद्ध गायिकेने भर कार्यक्रमात आपल्या साखरपुड्याची घोषणा केली आहे. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडिया तुफान व्हायरल होत आहे.

Shreya Maskar

'धुरंधर' फेम गायिकेने केली साखरपुड्याची घोषणा

भर कार्यक्रमात दिली प्रेमाची कबुली

होणाऱ्या नवऱ्यासोबत केला रोमँटिक डान्स

प्रसिद्ध अभिनेत्रीने अनोख्या पद्धतीने आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे. तिने भर कार्यक्रमात आपल्या होणाऱ्या नवऱ्याची ओळख चाहत्यांना करून दिली. गायिका जस्मिन सँडलासने (Jasmine Sandlas) ने 'द ड्रीम गर्ल इंडिया' या दौऱ्यादरम्यान चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.

लाइव्ह कॉन्सर्टमध्ये परफॉर्मन्स करताना जस्मिनने अधिकृतपणे साखरपुड्याची घोषणा केली. तिने आनंदाने आपल्या हातातील साखरपुड्याची अंगठी सर्वांना दाखवली. तसेच त्यानंतर तिचा जोडीदार शेखर चौधरीची सर्वांना ओळख करून दिली. ही गुडन्यूज गायिकेने दिल्लीतील लाइव्ह कॉन्सर्टमध्ये दिली. चाहत्यांच्या जल्लोषात गायिकेने शेखर चौधरीला मंचावर बोलावले. साखरपुड्याची अंगठी दाखवत तिने चाहत्यांना सांगितले, "हा माझा जोडीदार आहे..."

व्हायरल व्हिडीओमध्ये गायिका शेखर चौधरीसोबत रोमँटिक डान्स करताना दिसत आहे. तसेच ती आनंदाने उड्या मारताना दिसत होती. तिने जोडीदाराला घट्ट मिठी देखील मारली. तिचा आनंद गगनात मावत नव्हता. दोघांनी जस्मिनचे प्रसिद्ध गाणे 'लावन' (Laavan) यावर डान्स केला. या व्हिडीओवर चाहते भरभरून कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

जॅस्मिन सँडलास कोण?

जास्मिन सँडलास ही गायिका आणि टेलिव्हिजन व्यक्तिमत्व आहे. तिने आजवर पंजाबी आणि बॉलिवूड इंडस्ट्रीत भन्नाट गाणी गायली आहेत. ती मूळची पंजाबमधील आहे. अलिकडेच जास्मिन सँडलासने 'धुरंधर' चित्रपटातील गाणी गायली आहेत. शरारत, यार ना मिली , तरस अशी अनेक गाणी गायली आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sugar Free Modak: डायबिटीजची चिंता न करता खा मोदक; साखरेशिवाय बनवा झटपट आणि हेल्दी 'शुगर फ्री मोदक'

Maharashtra News Live Update: पुण्यातील मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीमच्या भव्य मिरवणूकीला सुरुवात

Diabetes and Panchamrit: डायबिटीज असलेल्या व्यक्तींनी पंचामृत प्यावे की नाही? जाणून घ्या

Pune : प्रायव्हेट पार्टला हळद कुंकू लावलं,पतीचा मंगळदोष काढण्यासाठी अघोरी पूजा, पुण्यात भयंकर प्रकार

Latest Mangalsutra Designs: नऊवारी साडीवर उठून दिसतील अस्सल पारंपारिक मंगळसूत्र, 5 लेटेस्ट डिझाईन्स

SCROLL FOR NEXT