Dhurandhar Collection SAAM TV
मनोरंजन बातम्या

Dhurandhar Collection : ४ दिवसांत 'धुरंधर' मालामाल; रणवीरने मोडला दीपिकाच्या चित्रपटाचा रेकॉर्ड, वाचा कलेक्शन

Dhurandhar Box Office Collection Day 4 : रणवीर सिंहचा 'धुरंधर' चित्रपट रिलीज होऊन चार दिवस पूर्ण झाले आहेत. चित्रपटाची एकूण कमाई जाणून घेऊयात.

Shreya Maskar

'धुरंधर' चित्रपट 5 डिसेंबर 2025 ला रिलीज झाला.

'धुरंधर' ॲक्शन चित्रपट असून यात रणवीर सिंह मुख्य भूमिकेत आहे.

रणवीर सिंहच्या 'धुरंधर'ने दीपिका पदुकोणच्या चित्रपटाला मागे टाकले आहे.

रणवीर सिंहचा 'धुरंधर' चित्रपट 5 डिसेंबर 2025 ला थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. 'धुरंधर' चित्रपट आदित्य धर याचा आहे. 'धुरंधर'ने वीकेंडला बंपर कमाई केली आहे. 'धुरंधर' लवकरच 200 कोटींचा टप्पा पार करेल. 'धुरंधर' मधील रणवीर सिंह आणि सारा अर्जुनचा रोमँटिक अंदाज चाहत्यांना खूप आवडला आहे. 'धुरंधर' हा ॲक्शन चित्रपट आहे. चार दिवसांत 'धुरंधर'ची कमाई जाणून घेऊयात.

'धुरंधर' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 4

  • पहिला दिवस - 28 कोटी रुपये

  • दुसरा दिवस - 32 कोटी रुपये

  • तिसरा दिवस - 43 कोटी रुपये

  • चौथा दिवस - 23 कोटी रुपये

  • एकूण - 126 कोटी रुपये

रेकॉर्ड ब्रेक कामगिरी

'धुरंधर' चित्रपटाने रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण यांच्या 'गोलियों की रासलीला राम-लीला' चित्रपटाला मागे टाकले आहे, ज्याची बॉक्स ऑफिसवर एकूण कमाई 117.53 रुपये आहे. 'धुरंधर' 2025 मधील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक ओपनिंग मिळवणारा चित्रपट ठरला, ज्यामध्ये अहान पांडे आणि अनित पड्डा यांच्या 'सैयारा'ला मागे टाकले आहे.

'धुरंधर' पाहून रणवीर सिंहची बायको आणि बॉलिवूडची मस्तानी दीपिका पादुकोणने चित्रपटाचे खूप कौतुक केले. 'धुरंधर' चित्रपटात रणवीर सिंह मुख्य भूमिकेत आहे. त्याने चित्रपटासाठी सर्वाधिक फी घेतली आहे. मीडिया रिपोर्टनुसार,'धुरंधर' साठी रणवीरने तब्बल 30-50 कोटी रुपये मानधन घतेल. तर साराने चित्रपटातून 1 कोटी रुपये कमावले आहेत.

'धुरंधर'चे कलाकार

कंधार अपहरण आणि २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यांसह अनेक सत्य घटनांपासून चित्रपट प्रेरित आहे. 'धुरंधर' चित्रपटात रणवीर सिंहसोबत संजय दत्त, अर्जुन रामपाल, सारा अर्जुन, अक्षय खन्ना, आर माधवन, राकेश बेदी हे तगडे कलाकार झळकले आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, 'धुरंधर' अंदाजे 280 कोटींच्या बजेटमध्ये बनलेला चित्रपट आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नाशिक- मुंबई महामार्गावरील नवीन कसारा घाटात अपघात

Mumbai School Holiday: मुंबईतील शाळा- महाविद्यालयांना उद्या सुट्टी, BMC कडून मोठा निर्णय

इंजिनिअरिंग करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! महाराष्ट्रासह १४ राज्यातील ५८ इंजिनिअरिंग कॉलेज बंद? काय आहे कारण?

Health Care : जेवल्या जेवल्या लगेच प्रचंड झोप येतेय? तुमच्या ताटातच दडलंय 'हे' मोठं कारण

School Holiday: सर्व शाळा- महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर, रायगड- पालघर जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT