Box Office Collection: आदित्य धरचा 'धुरंधर' हा चित्रपट ५ डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला. प्रदर्शित होऊन १३ दिवस झाले आहेत आणि चित्रपट नवनवीन टप्पे गाठत आहे. चित्रपटात रणवीर सिंग हमजाची भूमिका साकारत आहे. चित्रपट आणि त्यातील कलाकारांना इतके प्रेम मिळत आहे की सर्वजण त्याचे कौतुक करत आहेत.
प्रेक्षकांना चित्रपट आवडतो
धुरंधरने दाखवून दिले आहे की जेव्हा प्रेक्षक खरोखर चित्रपटावर प्रेम करतात तेव्हा तो चित्रपट सगळे रेकॉर्ड ब्रेक करु शकतो. फक्त दोन आठवड्यात चित्रपट ५०० कोटींच्या जवळ पोहोचला आहे. प्रदर्शित होताना कदाचित कोणीही इतक्या उल्लेखनीय यशाची कल्पना केली नसेल.
दुसऱ्या आठवड्यात जोरदार कलेक्शन
चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर २८ कोटींची सुरुवात केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ३२ कोटी आणि तिसऱ्या दिवशी ४३ कोटींची कमाई केली. यामुळे पहिल्या आठवड्यात एकूण कलेक्शन २०७.२५ कोटींवर पोहोचले. धुरंधरसाठी सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे दुसऱ्या आठवड्यात त्याने पहिल्यापेक्षाही जास्त कलेक्शन केले. या चित्रपटाने ९ व्या दिवशी ५३ कोटी आणि १० व्या दिवशी ५८ कोटी कमावले. धुरंधरने १४ व्या दिवशी २३ कोटी कमावले. यामुळे चित्रपटाची एकूण कमाई ४६०.२५ कोटी झाली आहे. मागे
चित्रपटाने पाच दिवसांत २०० कोटींचा टप्पा ओलांडला. धुरंधरने पुष्पा २ चा विक्रम मोडला आहे. अवघ्या सहा दिवसांत २३० कोटी कमावून, धुरंधरने पठाण (४४६.२ कोटी), पुष्पा २ (१९६.५० कोटी), छावा (१८०.२५ कोटी), बाहुबली २ (१४३.२५ कोटी) आणि स्त्री २ (१४१.४० कोटी) या चित्रपटांच्या दुसऱ्या आठवड्यातील कमाईला मागे टाकले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.