Nadeem Khan Arrested Saam Tv
मनोरंजन बातम्या

Actor Arrested: 'धुरंधर' फेम अभिनेत्याला अटक; घरकाम करणाऱ्या महिलेवर बलात्कार केल्याच्या आरोप

Nadeem Khan Arrested: 'धुरंधर' चित्रपटातील अभिनेता नदीम खान अटक केली आहे. घरकाम करणाऱ्या महिलेशी १० वर्षे लैंगिक शोषण व बलात्कार केल्याचा गंभीर आरोप, मुंबई पोलिसांचा तपास सुरू आहे.

Shruti Vilas Kadam

Actor Arrested: मुंबईतील मनोरंजन विश्वाला धक्का देणारी घटना समोर आली आहे. धुरंधर चित्रपटातील अभिनेता नदीम खान यांना घरकाम करणाऱ्या महिलेशी जवळपास १० वर्षे बलात्कार व लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी या प्रकरणी कारवाई करत नदीम खान यांना ताब्यात घेतले असून सध्या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला अभिनेता नदीम खानच्या घरी घरकाम करत होती. नदीम खानने तिला लग्नाचे खोटे आश्वासन देत अनेक वर्षे शारीरिक संबंध ठेवले, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. पीडितेच्या म्हणण्यानुसार, २०१५ पासून आरोपीने तिचा विश्वास संपादन करून वारंवार तिच्यावर अत्याचार केला. महिलेने सुरुवातीला या प्रकरणाची तक्रार करण्यास भीती वाटत होती. मात्र, आरोपीने लग्नास स्पष्ट नकार दिल्यानंतर आणि मानसिक छळ वाढल्यानंतर तिने अखेर पोलिसांकडे धाव घेतली. या प्रकरणी झिरो एफआयआर दाखल करण्यात आली असून नंतर तपास मालवणी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला.

पोलिस तपासात नदीम खानविरोधात बलात्कार, लैंगिक शोषण आणि फसवणूक यासारख्या गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राथमिक चौकशीत पीडितेचे जबाब नोंदवण्यात आले असून, वैद्यकीय तपासणी व इतर पुरावे गोळा करण्यात येत आहेत. नदीम खानला न्यायालयात हजर करण्यात आले असून पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली आहे.

या प्रकरणामुळे चित्रपटसृष्टीत मोठी खळबळ उडाली असून सोशल मीडियावरही वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. कायद्याच्या चौकटीत निष्पक्ष तपास होऊन पीडितेला न्याय मिळावा, अशी मागणी विविध स्तरांतून होत आहे. तपास पूर्ण झाल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT