Dhurandhar 2 saam tv
मनोरंजन बातम्या

Dhurandhar 2 : खऱ्या आयुष्यातही रणवीर सिंहचे पाकिस्तानशी आहे खास कनेक्शन, वाचून बसेल ४४० व्होल्टचा धक्का

Ranveer Singh Pakistan Connection : सध्या बॉक्स ऑफिसवर फक्त 'धुरंधर २' ची हवा पाहायला मिळत आहे. रणवीर सिंहचे खऱ्या आयुष्यातही पाकिस्तानशी कनेक्शन आहे. नेमका संबंध काय, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

'धुरंधर २' चित्रपट आदित्य धर दिग्दर्शित आहे.

'धुरंधर २' मध्ये रणवीर सिंहने हमजा अलीची भूमिका साकारली आहे.

खऱ्या आयुष्यातही रणवीर सिंहचे पाकिस्तानसोबत खास नाते आहे.

आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर २' जगभरात बक्कळ कमाई करत आहे. 'धुरंधर २' च्या कमाईत दिवसेंदिवस वाढ होताना पाहायला मिळत आहे. 'धुरंधर २' ने जगभरातील बॉक्स ऑफिस कलेक्शन १,५६४ कोटी रुपयांचा टप्पा ओलांडले आहे.'धुरंधर २' या चित्रपटात रणवीर सिंह एका भारतीय एजंटच्या भूमिकेत पाकिस्तानला जातो, जिथे तो पाकिस्तानी नागरिक म्हणून राहतो. खऱ्या आयुष्यातही रणवीर सिंहचे पाकिस्तानशी कौटुंबिक संबंध जोडलेले आहेत.

रणवीर सिंहचे पाकिस्तानशी नेमकं कनेक्शन काय?

रणवीर सिंहचे पूर्वज पाकिस्तानशी जोडलेले आहे. हे नाते त्याच्या आजी, चांद बर्क यांच्यामार्फत आहे. चांद बर्क यांचा जन्म पाकिस्तानमध्ये झाला होता आणि १९४७ च्या फाळणीदरम्यान त्या मुंबईला स्थलांतरित झाल्या होत्या. त्यांची आजी एक सुप्रसिद्ध अभिनेत्री होत्या, ज्यांना 'पंजाबची डान्सिंग लिली' म्हणून ओळखले जात असे. त्यांनी लाहोरमध्ये निर्मित चित्रपटांमध्ये अभिनय देखील केला होता.

बीबीसी इंडियाच्या अहवालानुसार, रणवीर सिंहची आजी, चांद बर्क १९४० च्या दशकात अविभाजित भारतातील पंजाबमधील एका गावात राहत होती. आता, तेच ठिकाण सध्याच्या पाकिस्तानमध्ये येते. या अहवालानुसार, ख्रिश्चन बर्क कुटुंब अविभाजित भारतातील पंजाबमध्ये राहत होते. सॅम्युअल मार्टिन बर्क आणि त्यांची बहीण, चांद बर्क हे या कुटुंबाचा भाग होते. सॅम्युअल पुढे जाऊन ११ देशांमध्ये पाकिस्तानचे राजदूत बनले तर चांद या हिंदी चित्रपटसृष्टीत एक सहाय्यक अभिनेत्री म्हणून नावारूपाला आल्या. फाळणीनंतर ते गाव आता पाकिस्तानमध्ये समाविष्ट झाले आहे. चांद बर्क ही 'धुरंधर' अभिनेता रणवीर सिंगची आजी आहे.

कोण होत्या चांद बर्क?

अहवालानुसार, चांद बर्क या हिंदी आणि पंजाबी चित्रपटांमध्ये लोकप्रिय होत्या. त्यांनी पाकिस्तानमधील लाहोरमध्ये तयार झालेल्या चित्रपटांमध्येही काम केले होते. त्या त्यांच्या नृत्यासाठी प्रसिद्ध होत्या. रणवीर सिंगची कौटुंबिक मुळे अविभाजित भारतातील पंजाबमध्ये रुजलेली आहेत. चांद बर्क यांनी 'बूट पॉलिश' (१९५४) या चित्रपटात, त्यांनी लहान अनाथ मुलांचा मानसिक आणि शारीरिक छळ करणाऱ्या एका महिलेची भूमिका साकारली होती. त्यांनी राज कपूर, नर्गिस, निम्मी, प्रदीप कुमार, प्राण आणि मनोज कुमार यांसारख्या कलाकारांसोबतही काम केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime नवऱ्याकडून गर्भातील बाळाच्या DNA टेस्टची मागणी, ५ महिन्यांच्या गरोदर महिलेची आत्महत्या

Maharashtra News Live Update: पल्स पोलिओ लसीकरणाचा शुभारंभ उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते

निवृत्त DIG च्या घरावर ईडीचा छापा; तब्बल ५३ कोटींची संपत्ती जप्त

Gaurav and Akanksha: 'आम्ही वर्षभरापासून वेगळे राहतोय'; बिग बॉस विजेता गौरव खन्ना आणि आकांक्षा यांचा ९ वर्षांचा संसार मोडला

High Blood Pressure : वयाच्या 30-40 मध्येच वाढतोय BP? जाणून घ्या यामागची मोठी कारणं

SCROLL FOR NEXT