Dhurandhar 2 Saam Tv
मनोरंजन बातम्या

Dhurandhar 2: उझैर बलोचचा आदित्य धरलसाठी खास मेसेज; म्हणाला, 'माझ्या आयुष्यातील बेस्ट ईद'

Dhurandhar 2: धुरंधर 2 हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासूनच चर्चेत आहे आणि आतापर्यंत ३३९ कोटींची कमाई करून त्याने नवा रेकॉर्ड केला आहे. धुरंधर २ प्रदर्शनानंतर दानिश पांडोरने लिहीला खास मेसेज.

Shruti Vilas Kadam

Dhurandhar 2: धुरंधर 2 हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासूनच चर्चेत आहे आणि आतापर्यंत ३३९ कोटींची कमाई करून त्याने नवा रेकॉर्ड केला आहे. शिवाय, धुरंधर 2 ला बॉलिवूड आणि दक्षिण भारतीय अशा दोन्ही चित्रपटसृष्टींमधील दिग्गजांकडून भरभरून प्रेम मिळत आहे. या चित्रपटात उझैर बलोच ही भूमिका साकारणाऱ्या दानिश पांडोरने नुकतीच धुरंधर 2 चे दिग्दर्शक आदित्य धर यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली. त्याने या वर्षाची ईद आपल्या आयुष्यातील सर्वोत्तम ईद असल्याचेही नमूद केले. सोशल मीडियावर दिग्दर्शक आदित्य धर यांचे आभार मानत, दानिशने 'उझैर'ची भूमिका आपल्यावर सोपवल्याबद्दल आदित्य यांचे आभार मानले.

'धुरंधर' सोबतचा फोटो शेअर केला

धुरंधर 2 मध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या दानिशने, काही वेळापूर्वीच आपल्या इन्स्टाग्रामवर आदित्य यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला. या चित्रपटाचा एक भाग होण्याची संधी दिल्याबद्दल त्याने दिग्दर्शकाचे मनापासून आभार मानले. हा चित्रपट १९ मार्च रोजी, म्हणजेच ईदच्या अगदी आधी, चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला होता. दानिशने याला आपल्याला आतापर्यंत मिळालेली सर्वोत्तम 'ईदी' म्हटले आणि त्याने लिहिले: "आदित्य धर सर, तुमच्या या भव्य प्रकल्पाचा एक भाग बनवल्याबद्दल आणि मला 'उझैर'ची भूमिका दिल्याबद्दल पुन्हा एकदा तुमचे आभार.

दानिशने पुढे लिहीले, तुमच्यासोबत काम करणे हा केवळ एक अनुभव नव्हता; ती एक अशी भावना होती जी मी आयुष्यभर जपून ठेवीन. माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल, माझ्या क्षमतेवर विश्वास दाखवल्याबद्दल आणि तुमच्या चित्रपटात मला इतकी उत्तम भूमिका दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. माझ्या हृदयाचा एक तुकडा कायम इथेच राहील. माझे 'बॉस', मी तुमचा सदैव ऋणी राहीन. लव्ह यू. ही आतापर्यंतची बेस्ट 'ईदी' आहे. धुरंधर 2."

'धुरंधर'ने रचला नवा रेकॉर्ड

५ डिसेंबर २०२५ रोजी प्रदर्शित झालेल्या 'धुरंधर' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही जबरदस्त कामगिरी केली होती. १,३५० कोटींहून अधिक कमाई करत 'धुरंधर'ने सर्वांनाच थक्क केले. आता, 'धुरंधर २' हा चित्रपटही चित्रपटगृहांमध्ये दाखल झाला आहे, त्याला प्रेक्षकांकडून अत्यंत उत्साही प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाने तीन दिवसात ३०० कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य धर यांनी केले असून, रणवीर सिंग आणि सारा अर्जुन यांनी यात मुख्य भूमिकेत आहेत. तर अर्जुन रामपाल, संजय दत्त, आर.माधवन सारखे कलाकार महत्वपूर्ण भूमिकेत आहेत.

नोकरदारांसाठी मोठी अपडेट! EPFO मध्ये अतिरिक्त रक्कम भरण्याचा प्रस्ताव, जाणून घ्या काय होऊ शकतो बदल

Hair Loss In Men: केस झपाट्याने गळतायत? वेळीच करा या टेस्ट, शरीरातील गंभीर आजाराचं असू शकतं लक्षण!

Back Pain : कॅन्सरपेक्षा कंबरदुखी खतरनाक, नेहमीच्या 'या' ५ सवयी ठरतायत धोकादायक

बांगलादेश ताब्यात घेणार! डेडलाईनही ठरली; भाजप मंत्र्याचं वादग्रस्त विधान

आणखी एका राजकीय भूकंपाची चर्चा! मुख्यमंत्र्यांनी हात काढला तर बंडखोर आमदारांचा गट होणार गायब, भाजप नेत्याच्या विधानानं खळबळ

SCROLL FOR NEXT