Dhurandhar The Revenge Saam Tv
मनोरंजन बातम्या

Dhurandhar 2: 'धुरंधर २' मध्ये पंतप्रधान मोदींचा खरोखरच कॅमिओ? व्हायरल सीनमागील सत्य आले समोर

Dhurandhar The Revenge: आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर २' या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. अडव्हान्स बुकिंगमध्ये या चित्रपटाने नवा रेकॉर्ड केला आहे.आता त्यातील एका खास सीनमुळे तर सोशल मीडियावर मोठी खळबळ उडाली आहे.

Shruti Vilas Kadam

Dhurandhar The Revenge: आदित्य धर दिग्दर्शित आणि रणवीर सिंह याच्या अभिनयाची जादू असलेला धुरंधर २ चित्रपट बॉक्स ऑफिसवर धडकलाय. गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाची हाईप सोशल मीडियावर होतीच. चित्रपटात बडे साहबचा रोल कोण करणार? त्यापासून ते चित्रपटाच्या दुसऱ्या भागात काय असेल, ही चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरूच होती. पण चित्रपट रिलिज झाला अन् सोशल मीडियावर मोदींचीच चर्चा सुरू झाली. होय.. कारण, धुरंधर २ या चित्रपटात मोदींचा कॅमिओ असल्याची चर्चा सुरू झाली आहे. धुरंधर चित्रपटाचे काही प्रसंग इन्स्टाग्राम, फेसबुक आणि एक्सवर वाऱ्यासारखे व्हायरल झाले आहेत. त्यामध्ये मोदींचं ऐतिहासिक भाषण दिसत आहे.

आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर २' या चित्रपटातील काही सीन व्हायरल होत असून सोशल मीडियावर जोरदार रंगली आहे. या व्हायरल सीनमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे प्रेक्षकांच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे की, पंतप्रधान मोदी यांनी खरोखरच या चित्रपटात कॅमिओ केला आहे का? मात्र, सत्य थोडे वेगळे आहे. या चित्रपटात पंतप्रधान मोदी आहेत, पण प्रत्यक्ष रूपात नाहीत. चित्रपटात दाखवण्यात आलेल्या सीनमध्ये मोदींचा कॅमिओ नसून, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर त्यांनी दिलेल्या भाषणाचे फुटेज वापरण्यात आले आहे. हे फुटेज स्टोरीमध्ये परफेक्ट बसल्यामुळे प्रेक्षकांना वाटत आहे की, या चित्रपटात पंतप्रधान मोदींनी कॅमिओ केला आहे.

दरम्यान, चित्रपटाचे दिग्दर्शक आदित्य धर यांनी या चित्रपटातून देशवासीयांची देशभक्ती जागी करण्याचे काम केले आहे. या चित्रपटात दाखवलेले प्रत्येक ट्विस्ट आणि सरप्राईज पाहून प्रेक्षक थक्क होत आहेत. प्रेक्षकांसह अल्लू अर्जुन, अनन्या पांडे, राम गोपाल वर्मा, प्रीती झिंटा यांसारख्या अनेक कलाकारांनी या चित्रपटाचे भरभरून कौतुक केले आहे.

‘धुरंधर २’ हा फक्त ॲक्शन फिल्म नसून देशभक्तीपूर्ण अनुभव देणारा चित्रपट आहे. या चित्रपटात रणवीर सिंगसह अर्जुन रामपाल, संजय दत्त, आर. माधवन, सारा अर्जुन, राकेश बेदी, गौरव गेरा, दानिश पांडोर, सौम्या टंडन, नवीन कौशिक आदी कलाकार महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहेत.

अपघाताचा थरार! चालकाचं कारवरील नियंत्रण सुटलं अन् ३-४ वाहनांना धडाधड उडवलं

Maharashtra News Live Update: अमरावती जिल्ह्यातील सोनोरी गावात वाघाच्या हल्ल्यामध्ये पंधरा वर्षीय मुलीचा मृत्यू

...तर भाजपला आम आदमी पार्टी व्हायला वेळ लागणार नाही; आमदाराच्या कार्यकर्त्यांना कानपिचक्या

Types of Paithani Saree Design: सणासुदीत उठून दिसायचंय? ट्राय करा 'या' ७ खास लेटेस्ट डिझाइन्सची पैठणी साडी

Mumbai Beach : मुंबईजवळचं 'मिनी गोवा'! पावसाळ्यात निसर्ग प्रेमींसाठी परफेक्ट ठिकाण

SCROLL FOR NEXT