उपवासांमुळे प्रचंड थकवा आलाय? शरीरात ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी प्या ‘हे’ 5 ड्रिंक्स

Manasvi Choudhary

उपवास

उपवासादरम्यान नेहमीपेक्षा कमी खाण्यापिण्यामुळे शरीरात थकवा येतो. अनेकांना थकवा, अशक्तपणा, चक्कर आल्यासारखे वाटते. अशावेळी तुम्ही हैल्दी ड्रिंक्सचे सेवन करावे.

Puaj Ritual

नारळपाणी

नारळपाणी नैसर्गिक एनर्जी ड्रिंक आहे. उपवासाच्या दिवशी तुम्ही नारळपाणी प्यायल्याने शरीरातील पाण्याची कमतरता भरून निघते, अशक्तपणा दूर होतो आणि शरीराला त्वरित ऊर्जा मिळते.

Coconut water | pinterest

मखान्या आणि दुधाचा मिल्कशेक

मखान्यामध्ये कॅल्शियम, प्रोटीन आणि भरपूर प्रमाणात फायबर असते. मखाने तुपात भाजून दुधात मॅश करून किंवा ड्रायफ्रूट्स टाकून मिल्कशेक तुम्ही बनवा.

Makhana & Milkshake | pinterest

बदाम-मधाचे दूध

बदामामध्ये हेल्दी फॅट्स आणि प्रथिने असतात. भिजवलेले बदाम दुधात वाटून त्यात मध घालून तुम्ही हे ड्रिंक बनवू शकता. जे थकवा दूर करते.

Almond & Honey Milk | pinterest

लिंबू-पाणी किंवा ताक

उपवासात साधे किंवा जिरेपूड घातलेले ताक प्यायल्याने पचनक्रिया उत्तम राहते. शरीराला ग्लुकोज मिळते आणि चक्कर येण्याचा त्रास होत नाही.

Chaas | GOOGLE

केळी ड्रायफ्रूट्स स्मूदी

केळीमध्ये पोटॅशियम आणि कार्बोहायड्रेट्स भरपूर असतात, जे झटपट ऊर्जा देतात. दूध, केळी आणि ड्रायफ्रूट्स एकत्र करून तुम्ही उपवासाची स्मूदी बनवू शकता.

Banana & Dry Fruits Smoothie | yandex

NEXT: पृथ्वीवर नागांचा जन्म कसा झाला? नागपंचमीच्या निमित्ताने जाणून घ्या पौराणिक कथा

Nag Panchami 2026
येथे क्लिक करा..