Manasvi Choudhary
आज नागपंचमी हा सण आहे. हिंदू धर्मात नागपंचमी हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात.
पौराणिक कथेनुसार, नाग देवतेला पूजनीय मानले जाते. नागपंचमीला नागदेवताची पूजा केली जाते.
पण तुम्हाला कधी असा प्रश्न पडला आहे का? पृथ्वीवर नागांचा जन्म कसा झाला?
हिंदू धर्मग्रंथांनुसार, 'महाभारत' आणि 'कश्यपसंहिता' मध्ये नागवंशाच्या उत्पत्तीची माहिती उपलब्ध आहे.
माहितीनुसार, पृथ्वीवर नागांची उत्पत्ति ब्रह्मदेवाचे मानस पुत्र कश्यप ऋषी आणि त्यांची पत्नी कद्रूच्या पोटी झाली.
कद्रूने महर्षींना १००० पराक्रमी नागांची आई होण्यासाठी वरदान मागितले. तेव्हा कद्रूने हजारो नागांना जन्म दिला.
ज्यातील प्रमुख नाग अनंत, वासुकी, तक्षक, कर्कोटक, महापद्म, शंख , पिंगला आणि कुलिक होते.
यांनीच पुढे पाताळलोकात आपले राज्य स्थापन केले आणि पृथ्वीच्या संतुलनात महत्त्वाची भूमिका बजावली, अशी धार्मिक श्रद्धा आहे.