Manasvi Choudhary
श्रावण या पवित्र महिन्यातील पहिला सण म्हणजे नागपंचमी. आज नागपंचमी हा सण सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा होत आहे.
नागपंचमी या दिवशी महिला नागाची पूजा करतात आणि उपवासाचे व्रत करतात. अनेक ठिकाणी बहिणी या आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी, आरोग्यासाठी नागपंचमीचा उपवास करतात.
पण नागपंचमीचा उपवास भावासाठी का केला जातो? यामागील नेमके कारण काय? ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या.
नागंपचमीच्या दिवशी नागाची पूजा केल्याने कुटुंबावर येणारी संकटे दूर होतात. विषारी प्राण्यांपासून रक्षण होते आणि घरात सुख- समृद्धी नांदते अशी धार्मिक श्रद्धा आहे.
नागदेवतेला पृथ्वीचे रक्षणकर्ता मानले जाते. नाग जसा आपल्या फणीखाली संपूर्ण सृष्टीचे संरक्षण करतो, त्याचप्रमाणे भाऊ आपल्या बहिणीचे आयुष्यभर रक्षण करतो, अशी श्रद्धा आहे.
महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये विविध पद्धतीने नागपंचमी हा सण साजरा केला जातो. काही ठिकाणी बहिण भावासाठी उपवासाचे व्रत पाळते तर काही ठिकाणी नागपंचमी या सणादिवशी नागाची पूजा केली जाते नैवेद्य दाखवला जातो.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.