dhurandhar 2 actor Aditya Uppal received death threat 
मनोरंजन बातम्या

Dhurandhar 2: 'धुरंधर २' अभिनेत्याला जीवे मारण्याची धमकी; बॉलिवूडमध्ये खळबळ, पाकिस्तान कनेक्शन उघड

Dhurandhar 2 Actor: धुरंधर २ या चित्रपटामध्ये 'ओमर हैदर' हे पात्र साकारणारा अभिनेता आदित्य उप्पल याला पाकिस्तानमधून जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. यासोबतच, त्याने सांगितले की, पाकिस्तानमधील काही लोक त्याच्या अभिनयाचे कौतुकही करत आहेत.

Shruti Vilas Kadam

Dhurandhar 2: दिग्दर्शक आदित्य धर यांचा धुरंधर: द रिव्हेंज हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत आहे. देशासह आंतरराष्ट्रीय स्तरावरही या चित्रपटाची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयालाही प्रेक्षकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. यामध्ये एसपी अस्लम चौहानसोबत दिसणारा अभिनेता आदित्य उप्पल म्हणजेच ‘एसीपी ओमर हैदर’ याचेही विशेष कौतुक होत आहे. पण आता आदित्य उप्पलने एक धक्कादायक खुलासा केला आहे.

एका मुलाखतीदरम्यान आदित्यने सांगितले की, त्याला पाकिस्तानमधून मोठ्या प्रमाणात कौतुकाचे मेसेज येत आहेत. परंतु, याचसोबत काही लोकांकडून त्याला जीवे मारण्याच्या धमक्याही दिल्या जात आहेत. काही लोकांना थेट इशारा देत म्हटले आहे की, जर आदित्य कधी खरचं आमच्या समोर आला तर ते त्याला सोडणार नाहीत. या प्रकारामुळे चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली आहे.

आदित्यने सांगितले की, 'मी फक्त एक अभिनेता आहे आणि चित्रपटात साकारलेली भूमिका ही काल्पनिक आहे.' तरीही काही लोक त्याच्या भूमिकेची तुलना खऱ्या आयुष्यातील ओमर हैदरसोबत करत आहेत. ओमर हैदर हा सध्या पाकिस्तानमध्ये पोलीस अधीक्षक (SP) पदावर कार्यरत असून, त्याने आदित्यच्या अभिनयाचे कौतुक केले आहे. यासह दुबईस्थित एका जागतिक ब्रँडच्या सीईओकडून आदित्यला नियमित कौतुकाचे संदेश मिळत आहेत. या सीईओनेच आदित्य आणि खऱ्या ओमर हैदर यांच्यात संपर्क घडवून आणला.

दरम्यान, धुरंधर २ चित्रपटाची बॉक्स ऑफिसवरील सगळे रेकॉर्ड ब्रेक करत आहे. या चित्रपटाने जगभरात ९५० कोटींहून अधिक कमाई केली असून, भारतात ५०० कोटींचा टप्पा पार केला आहे. १९ मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पिंपरी मार्केटमध्ये मोबाईल चोरीची घटना; चोराचा कारनामा कॅमेऱ्यात कैद

महिनाभर रोज एक बदाम खाल्ल्यास शरीरात काय बदल होतील?

Soaked figs: 1 महिना नियमित भिजवलेले अंजीर खाल्ल्यास शरीरात काय बदल होतात?

Bribe Case : जालन्यात खळबळ! अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहाथ पकडले; असे अडकले जाळ्यात

Kangana Ranaut: 'तू विद्यार्थी नाही, बेकार आहेस'; कंगना रणौतचा सौरव दासवर पलटवार

SCROLL FOR NEXT