Dharmendra Pradhan Resign Saam Tv
मनोरंजन बातम्या

'Gen Z मैदानात उतरली आणि इतिहास घडला'; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर बॉलिवूड कलाकारांच्या भन्नाट प्रतिक्रिया

Dharmendra Pradhan Resign: धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आलिया भट्ट, प्रियंका चोप्रा, सोनाक्षी सिन्हा, विजय वर्मा यांच्यासह अनेक बॉलिवूड कलाकारांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिल्या. जाणून घ्या नेमकं काय म्हणाले.

Shruti Vilas Kadam

Dharmendra Pradhan Resign: केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपला राजीनामा सादर केल्यानंतर देशभरात त्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. नीट (NEET) परीक्षा आणि पेपरफुटी प्रकरणावरून सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय समोर आल्यानंतर अनेक राजकीय नेत्यांसह बॉलिवूड कलाकारांनीही सोशल मीडियावर प्रतिक्रिया व्यक्त केल्या. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा अद्याप अधिकृतरीत्या स्वीकारला गेला नसला तरी या घडामोडीने सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे.

या प्रकरणावर अभिनेत्री प्रियंका चोप्राने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर राजीनाम्याची बातमी शेअर करत टाळ्या, हृदय आणि स्माईल इमोजी पोस्ट केले. सोनाक्षी सिन्हानेही टाळ्यांच्या इमोजीसह 'भाई क्या कर दिया' असे म्हणत एक व्हिडिओ सोशल मिडियावर पोस्ट केला आहे.

आलिया भट्टने विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवणारी पोस्ट शेअर केली तिने या पोस्टमध्ये Gen Z मैदानात उतरली! आणि पुढचा इतिहास सर्वांनी पाहिलाच असे लिहिले. अभिनेत्री दिया मिर्झाने "Only Love Gen Z" असा संदेश देत तरुणांच्या एकजुटीचे कौतुक केले. त्यांच्या पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्या.

अभिनेता विजय वर्मा याने आपल्या खास प्रतिक्रिया देताना धर्मेंद्र प्रधान यांचा फोटो शेअर करून लोकप्रिय गाण्यातील "अच्छा चलता हूँ, दुआओं में याद रखना" ही ओळ लिहिली. त्याच्या या पोस्टची सोशल मीडियावर मोठी चर्चा झाली.

याशिवाय शबाना आझमी, प्रकाश राज, कमल हासन, विर दास, रोहन जोशी, विकी कौशल, ईशान खट्टर, अदिती राव हैदरी यांच्यासह अनेक कलाकारांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवणाऱ्या किंवा शिक्षण व्यवस्थेत सुधारणा करण्याची गरज व्यक्त करणाऱ्या पोस्ट शेअर केल्या. काहींनी हा निर्णय केवळ पहिला टप्पा असल्याचे म्हटले, तर काहींनी शिक्षण व्यवस्थेत पारदर्शकता वाढवण्याची मागणी केली.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT