Actress on Bollywood: 'अनेक कलाकारांना ड्रग्ज घेताना पाहिलं...'; प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितलं इंडस्ट्रीचं धक्कादायक सत्य

Actress on Bollywood: अभिनेत्री नारायणी शास्त्रीने मनोरंजन क्षेत्रातील ड्रग्जच्या वाढत्या वापराबाबत धक्कादायक दावा केला. पार्ट्यांमधील वातावरण, शूटिंगवरील परिणाम आणि स्वतःच्या अनुभवाबद्दलही तिने खुलासा केला.
Actress on Bollywood
Actress on BollywoodSaam Tv
Published On

Actress on Bollywood: मनोरंजन क्षेत्रातील कलाकारांच्या ग्लॅमरस लाईफस्टाईलची नेहमीच विविध चर्चा रंगत असतात. मात्र पडद्यामागील वास्तव अनेकदा वेगळं असतं. अशातच 'क्योंकि सास भी कभी बहू थी' आणि 'पिया का घर' या मालिकांमधून घराघरात पोहोचलेली लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री नारायणी शास्त्री हिने मनोरंजन क्षेत्रातील वाढत्या ड्रग्जच्या वापराबाबत धक्कादायक दावा केला आहे. सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत तिने सेलिब्रिटी पार्ट्यांमधील बदललेल्या वातावरणावर भाष्य करत अनेक धक्कादायक अनुभव शेअर केले.

नारायणी शास्त्रीने सांगितले, 'पूर्वी पार्ट्यांमध्ये दारूसाठी एक वेगळा बजेट असायचा. आता मात्र ड्रग्जसाठी देखील एक बजेट असतो. हे पाहून मला धक्काच बसला. म्हणूनच मी कित्येक वर्षांपूर्वी पार्ट्याला जाणे बंद केले कारण आता तिथे केवळ नाचणे किंवा मजा-मस्ती करणे उरलेले नाही. तिथे काहीतरी वेगळेच प्रकार चालतात. पार्ट्यांमध्ये येणाऱ्या प्रत्येकाला माहित असते की कोण कसली नशा करत आहे.' कोणत्या प्रकारच्या ड्रग्जचा वापर केला जातो, असा प्रश्न विचारल्यावर तिने कोकेन आणि एमडीएमए (MDMA) यांचा वापर सामान्य असल्याचे म्हटले आहे.

Actress on Bollywood
Shriya Pilgaonkar: 'आयुष्यात एकदा तरी पंढरपूर वारीला जायचं आहे...' श्रिया पिळगांवकरने सांगितलं घरी कशी साजरी होते एकादशी

याशिवाय तिने आयुष्यात फक्त एकदाच दारू घेतल्याचाही खुलासा केला. "कोणी माझ्या ड्रिंकमध्ये काही मिसळलं तर त्याचा परिणाम कसा होतो, हे समजून घेण्यासाठी मी एकदाच दारू पिऊन पाहिली होती. तो माझा पहिला आणि शेवटचा अनुभव होता," असंही तिने सांगितलं.

Actress on Bollywood
Atul Kulkarni: 'आजच्या परिस्थितीला आम्हीच जबाबदार'; जेन झीच्या आंदोलनाला प्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्याचा पाठिंबा

शूटिंगदरम्यान कलाकार ड्रग्जच्या प्रभावाखाली असल्यामुळे अनेकदा कामावर परिणाम होत असल्याचाही दावा नारायणीने केला. काही कलाकार शूटसाठी शुद्धीत नसल्यामुळे शूटिंग रद्द करावं लागायचं किंवा तासन्‌तास थांबावं लागायचं. अशा परिस्थितीत निर्मात्यांसमोर मोठं संकट उभं राहतं. एखाद्या कलाकाराला तातडीने बदलणं शक्य नसल्याने अनेकदा त्यांच्या कुटुंबीयांची मदत घेऊन शूटिंग पूर्ण करण्याची वेळ येते, असंही नारायणी शास्त्रीने या मुलाखतीत सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com