dharmendra Health Update  SAAM TV
मनोरंजन बातम्या

VIDEO: हॉस्पिटलमधून परतल्यानंतर धर्मेंद्र यांनी शेअर केला व्हिडिओ, म्हणाले...

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

Nandkumar Joshi

मुंबई: बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) यांना चार दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना रविवारी रुग्णालयातून सोडण्यात आलं. रुग्णालयातून पूर्ण बरे होऊन आल्यानंतर त्यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला. रुग्णालयात दाखल करण्याचं कारण त्यांनी आपल्या चाहत्यांना सांगितलं. एक्सरसाइज करताना त्यांच्या पाठीत दुखायला लागलं. त्यानंतर तात्काळ त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

धर्मेंद्र यांनी शेअर केला व्हिडिओ

सूत्रांच्या माहितीनुसार, पाठदुखीमुळं त्यांना नियमित वैद्यकीय तपासणीसाठी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं नव्हतं. चार दिवसांच्या उपचारानंतर ते पूर्णपणे बरे झाले असून, रविवारी त्यांना घरी सोडण्यात आलं. रुग्णालयातून घरी आल्यानंतर त्यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट करून आपल्याला आलेला अनुभव चाहत्यांसोबत शेअर केला. 'मित्रांनो, पाठदुखीमुळं मला रुग्णालयात दाखल व्हावं लागलं. मागील चार दिवस खूपच त्रास झाला. तुमच्या सर्वांच्या शुभेच्छा आणि आशीर्वादामुळं मी घरी परतलो आहे. काळजी करू नका. यापुढे मी सतर्क राहील,' असं धर्मेंद्र यांनी व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं.

८६ वर्षीय धर्मेंद्र हे आरोग्याच्या बाबतीत खूपच सतर्क असतात. नेहमीच व्यायाम करतात. स्विमिंगचीही त्यांना आवड आहे. त्यामुळं ते नेहमीच तंदुरुस्त असतात. रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी ते चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र होते. धर्मेंद्र हे करण जोहर यांच्या आगामी चित्रपटात दिसणार आहेत. बऱ्याच महिन्यांपासून या चित्रपटाचं शूटिंग सुरू आहे. या चित्रपटात आलिया भट्ट आणि रणवीर सिंह प्रमुख भूमिकेत असतील. तसेच जया बच्चन आणि शबाना आझमी देखील या चित्रपटात खास भूमिका निभावणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: महापालिकेतील स्वीकृत सदस्य निवडीचा सस्पेन्स अखेर संपला

MPSC Recruitment : मोठी बातमी! MPSC च्या विद्यार्थ्यांना दिवाळी भेट; १६७१७ पदांसाठी भरती

Health Update : शरद पवारांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट, डॉक्टरांनी काय सांगितलं?

Maharashtra Forts : मराठ्यांच्या शौर्याचे प्रतीक! महाराष्ट्रातील ७ अभेद्य किल्ले, शत्रूला जिंकणे होतं कठीण

IND vs NZ : भारताने पुन्हा नाणेफेक जिंकली; प्रथम फलंदाजी कोण करणार? पाहा प्लेईंग ११

SCROLL FOR NEXT