Dharmendra  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Dharmendra : मोठी बातमी! धर्मेंद्र रुग्णालयातून डिस्चार्ज, घरीच होणार उपचार

Dharmendra Health Update : बॉलिवूडचे ही-मॅन धर्मेंद्र यांची प्रकृती आता स्थिर असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यांचे हेल्थ अपडेट जाणून घेऊयात.

Shreya Maskar

धर्मेंद्र यांची अचानक तब्येत बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

धर्मेंद्र यांची प्रकृती आता स्थिर असल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

धर्मेंद्र यांच्यावर आता घरून उपचार केले जाणार आहेत.

बॉलिवूडचा ही-मॅन धर्मेंद्र (Dharmendra ) यांच्या प्रकृतीबाबात मोठी अपडेट समोर आली आहे. धर्मेंद्र यांची प्रकृती आता उत्तम असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. धर्मेंद्र यांच्यावर आता घरीच उपचार करण्यात येणार आहे. पीटीआयने याबाबतचे वृत्त दिलेय. गेल्या काही दिवसांपासून धर्मेंद्र यांची प्रकृती खालावली होती, त्यामुळे त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू होते. व्हेंटिलेटरवर उपचार घेत असल्याने चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण होत.

दोन दिवसांपासून धर्मेंद्र यांच्या निधनाच्या बातम्यांची उलटसुलट चर्चा सुरू होती. पण त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली आहे. त्यांच्यावर घरीच उपचार करण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून धर्मेंद्र यांची तब्येत बिघडली होती. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे धर्मेंद्र यांना मुंबईतील प्रसिद्ध ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

89 वर्षांचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती आता सुधारत आहे. धर्मेंद्र यांची प्रकृती खालावली समजताच संपूर्ण कुटुंब रुग्णालयात पोहचले. वेळोवेळी सोशल मीडियाच्या माध्यमातून कुटुंबीय धर्मेंद्र यांचे हेल्थ अपडेट देत आहेत. धर्मेंद्र रुग्णालयात दाखल असल्याचे समजताच बॉलिवूडच्या अनेक मोठ्या कलाकारांनी त्यांची भेट घेतली. धर्मेंद्र यांचे चाहते सध्या ते लवकर बरे व्हावे याची प्रार्थना करताना दिसत आहे. सोशल मीडियावर त्यांच्या प्रकृतीची चर्चा पाहायला मिळत आहे.

आगामी चित्रपट

धर्मेंद्र यांचा 'इक्कीस'(Ikkis) चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चाहते हा चित्रपट पाहण्यासाठी खूपच उत्सुक आहेत. नुकताच इक्कीसचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. ट्रेलरने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा मुख्य भूमिकेत झळकणार आहे. जयदीप अहलावत, एकवली खन्ना, सिकंदर खेर असे अनेक कलाकार पाहायला मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar : उत्तरे मिळायला हवीत! अजित पवार विमान अपघात अहवालावर जय पवार नाराज, स्पष्ट शब्दात म्हणाले...

Maharashtra Live News Update : खासदार निलेश लंके यांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग किल्ल्यावर स्वच्छता मोहीम

Raigad Tourism : अलिबागजवळील 'हा' सागरी किल्ला एकदा पाहाच, अरबी समुद्राच्या मनमोहक सौंदर्याच्या प्रेमात पडाल

Bigg Boss Marathi 6 : एक नव्हे 'बिग बॉस'मध्ये थेट ३ वाइल्ड कार्ड स्पर्धकांची एन्ट्री, घराचे तापमान वाढणार

Sanju Samson : गौतम गंभीरची गुगली! संजू सॅमसन नाही तर 'हा' खेळाडू आहे विजयाचा खरा शिल्पकार

SCROLL FOR NEXT