Karan Deol - Drisha Acharya's Sangeet Saam TV
मनोरंजन बातम्या

Karan Deol - Drisha Acharya's Sangeet : लग्न करणचं पण सेलिब्रेशन संपूर्ण देओल कुटुंबाचं! संगीत सोहळ्यात देओलांचा एकच जल्लोष

Dharmendra - Bobby Deol Dance : सनी देओलने 'गदर' मधील तारा सिंगचा लूक करुन आयकॉनिक गाणं 'मैं निकला गड्डी लेकर' वर धमाल डान्स केला.

Pooja Dange

Karan Deol - Drisha Acharya's Sangeet Ceremony : देओल कुटुंबात सध्या लगीनसराई सुरू आहे. सनी देओलचा मुलगा करण देओल त्याची गर्लफ्रेंड द्रिशा आचार्च सोबत लग्नगाठ बांधणार आहे. नुकताच त्यांचा संगीत समारंभ पार पडला. संगीतसाठी करण आणि द्रिशाने ड्रेसिंगमध्ये ट्युनिंग केल आहे.

देओल कुटुंबीयानी संगीत समारंभात डान्स करत धमाल केली. सनी देओलने 'गदर' मधील तारा सिंगचा लूक करुन आयकॉनिक गाणं 'मैं निकला गड्डी लेकर' वर धमाल डान्स केला. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Latest Entertainment News)

नातवाच्या लग्नात आजोबा धर्मेंद्रनीही धरला ठेका

नुकत्याच पार पडलेल्या संगीत समारंभात नातवासाठी आजोबा धर्मेंद्रही नाचताना दिसले. धर्मेंद्रनी स्वतःचे आयकॉनिक गाणे 'यमला पगला दिवाना' या गाण्यावर ताल धरला. यानिमित्ताने बऱ्याच वर्षांनी धर्मेंद्रला नाचताना पाहून चाहत्यांना मात्र आनंद झाला आहे. नातवासोबत स्वतःच्या गाण्यावर नाचताना धर्मेंद्र आनंदी दिसत होते.

काका बॉबी देओलनो सपत्नीक केला रोमान्टीक डान्स

करण देओलच्या लग्नात संपूर्ण देओल कुटुंब धमाल-मस्ती करताना दिसत आहे. करणचा काका म्हणजे बॉबी देओलनेही पुतण्याच्या लग्नात पत्नीसोबत डान्स केला. बॉबी देओल देखील बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध नाव आहे .

बॉबी देओलने पत्नी तानिया देओलसोबत 'बरसात' चित्रपटातील 'हमको सिर्फ तुमसे प्यार है' या गाण्यावर रोमान्टीक डान्स केला. बॉबी देओल आणि पत्नी तानिया देओलने मॅचिंग कपडे देखील घातले होते. बॉबी देओलने पिवळ्या रंगाची शेरवानी तर तानियाने पिवळ्या रंगाचा घागरा परिधान केला होता. दोघेही सुंदर दिसत होते. (Celebrity)

रणवीर सिंगनेही लावली हजेरी

बॉलिवूडमधील एनर्जीचा बादशाह रणवीर सिंगनेही करण-द्रिशाच्या संगीत समारंभाला हजेरी लावली होती. याचे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. रणवीर सिंगने नवरदेव करण देओलला उचलून घेऊन डान्स केला. चाहत्यांनी रणवीरच्या या एनर्जी वर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur: रात्री भररस्त्यात गाठलं, तिघांनी तरुणावर सपासप वार करत संपवलं; कोल्हापूर हादरले

Sreeleela: किसिक गर्ल श्रीलीलाचा नवा एलिगन्ट लूक पाहिलात का?

Tejashree Pradhan: तेजश्री प्रधानचं घर नेमकं आहे तरी कुठं? जाणून घ्या

Bhandara Rain Alert : भंडारा जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट; जिल्हा प्रशासनाकडून शाळांना दोन दिवसांची सुट्टी

Pimpri Chinchwad Crime : 'तू जाड आहेस' म्हणून हिणवलं, शाळेतील वाद टोकाला गेला; एकाचा दुसऱ्यावर प्राणघातक हल्ला

SCROLL FOR NEXT