Dharmaveer 2 Teaser Saam Tv
मनोरंजन बातम्या

Dharmaveer 2 Teaser : 'धर्मवीर २'चा दमदार टीझर रिलीज, पाहायला मिळतेय धर्मवीर आनंद दिघे यांच्या हिंदुत्त्वाची झलक

Dharmaveer 2 Teaser Released : प्रवीण विठ्ठल तरडे दिग्दर्शित ‘धर्मवीर २’चा टीझर सोशल मीडियावर रिलीज झालेला आहे. टीझरमध्ये प्रेक्षकांना धर्मवीर आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाची गोष्ट पाहायला मिळणार आहे.

Chetan Bodke

प्रवीण विठ्ठल तरडे दिग्दर्शित ‘धर्मवीर’ चित्रपटाची गेल्या काही दिवसांपूर्वी घोषणा करण्यात आली होती. आता टीझर सोशल मीडियावर रिलीज करण्यात आलेला आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर क्रांती दिनाच्या दिवशी अर्थात ९ ऑगस्टला रिलीज होणार आहे. धमाकेदार टीझरमध्ये प्रेक्षकांना धर्मवीर आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाची गोष्ट पाहायला मिळणार आहे. स्वर्गीय आनंद दिघे यांच्या चित्रपटातील "ज्याच्या घरातली स्त्री दुःखी, त्याची बरबादी नक्की" या दमदार संवादाने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. या धडाकेबाज टीझरमुळे आता प्रेक्षकांना चित्रपटाची उत्सुकता आहे.

टीझरमध्ये प्रेक्षकांना स्वर्गीय आनंद दिघे यांचा आक्रमकता दिसत आहे. अंगावर काटा येणाऱ्या ह्या टीझरमध्ये प्रेक्षकांना हिंदुत्त्वाची झलक पाहायला मिळत आहे. चित्रपटामध्ये धर्मवीर आनंद दिघे यांची भूमिका दिग्दर्शक आणि अभिनेता प्रसाद ओकने साकारली आहे. चित्रपटाची निर्मिती झी स्टुडिओज आणि साहील मोशन आर्ट्स या निर्मिती संस्थेचे मंगेश देसाई,उमेश कुमार बन्सल यांनी केली आहे कथा,पटकथा,संवाद आणि दिग्दर्शनाची जबाबदारी प्रवीण तरडे यांनीच निभावली असून कॅमेराम न म्हणून महेश लिमये यांनी काम पाहिले आहे.

काही दिवसांपूर्वीच ‘धर्मवीर २’ चित्रपटाचे पोस्टर लाँच करण्यात आले होते. ‘धर्मवीर २’च्या पोस्टरवर साहेबांच्या हिंदुत्त्वाची गोष्ट असा उल्लेख करण्यात आला आहे. धर्मवीर चित्रपटात दिघे साहेबांचे जीवनचरित्र दाखवल्यानंतर आता ‘धर्मवीर २’मध्ये हिंदुत्त्वाची गोष्ट कशी दाखवली जाणार असून याकडे आता सर्वांचे लक्ष लागले असून चित्रपटाबाबत कमालीची उत्सुकता आहे. ‘धर्मवीर’ चित्रपट थिएटरमध्ये फक्त मराठीमध्येच रिलीज झाला होता. पण आता ‘धर्मवीर’ चित्रपटाचा सिक्वेल मराठीसह हिंदी भाषेतही रिलीज होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bihar Election : बिहार निवडणुकीसाठी भाजपची दुसरी यादी जाहीर; माजी IPS आणि प्रसिद्ध गायिकेसहित कुणाला मिळाली संधी?

Hema Malini Birthday: हेमा मालिनी यांनी चित्रपटात काम करण्यासाठी नाव का बदललं? जाणून घ्या कारण

Men's health checkup: वयाच्या पन्नाशीनंतर पुरुषांनी 'या' चाचण्या करूनच घ्याव्यात; या गोष्टींवर लक्ष ठेवा

Maharashtra Live News Update: पालघर - बोईसर तारापूर एमआयडीसीत वायुगळती

Nanded Crime : पती बेपत्ता असल्याची तक्रार;दीड महिन्यानंतर धक्कादायक माहिती आली समोर, प्रियकराच्या मदतीने नदीत जिवंत फेकले

SCROLL FOR NEXT