Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi 5: DP दादा आणि निक्कीच्या रंगल्या चर्चा, म्हणाला "मी कोणत्याही टीमचा भाग नाही"

Dhananjay New Plan: डीपी दादांने बदलला खेळ, एकट्याने खेळण्याचा घेतला निर्णय

Manasvi Choudhary

'बिग बॉस मराठी'च्या घरात सदस्य आपला खेळ दाखवण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतात. खेळ दाखवताना कधी कोण कोणाचा गेम पलटवतं हे सांगू शकत नाही. पहिल्या आठवड्यात दिसणाऱ्या एका टीममध्ये शेवटच्या आठवड्यातही तेच एकीचं चित्र पाहायला मिळेल हे सांगता येत नाही. आता डीपी दादांनी त्यांचा खेळ दिसत नसल्याने स्वतंत्र खेळण्याचा निर्णय घेतलेला आजच्या भागात पाहायला मिळेल.

'बिग बॉस मराठी'च्या समोर आलेल्या प्रोमोमध्ये डीपी दादा आणि निक्की चर्चा करताना दिसत आहे. डीपी दादा म्हणत आहे,"मी कोणत्याही टीमचा भाग नाही आहे. स्टॅटर्जीच्या बाबतीत कोण बोलत होतं". त्यावर संग्राम डीपी दादांचं नाव घेतो. तर निक्की म्हणते,"पण दिसलं नाही ना". डीपी दादा पुढे म्हणतो,"अभिजीत आणि अंकितामुळे मी सावली झालो".

डीपी दादा पुढे म्हणतात,"मला जर दिसायचंय तर मी तुमच्यात खेळू शकत नाही". नेहमी अंकिताच्या पाठीशी असणारे, तिला वेळोवेळी सल्ले देणारे डीपी दादा आता एकटं खेळताना दिसून येणार आहेत. डीपी दादा कसा खेळ खेळणार याकडे आता 'बिग बॉस प्रेमीं'च्या नजरा लागल्या आहेत.

अरबाजचा ओव्हर कॉन्फिडन्स नडला

'बिग बॉस मराठी'च्या आजच्या भागात पॅडी दादा, अंकिता, अभिजीत आणि संग्राम अरबाजबद्दल चर्चा करताना दिसणार आहेत. पॅडी दादा म्हणत आहेत,"अरबाजचा नेहमीच ओव्हर कॉन्फिडन्स नडतो". संग्राम म्हणतो,"जिंकण्याचं कधीच सेलिब्रेशन करायचं नसतं. निक्कीचं का ऐकतो तो?. त्याला मतं नाहीत". पॅडी दादा पुढे म्हणतो,"निक्की अरबाजला घेऊन बुडणार एवढं नक्की".

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : ठाकरेंच्या मेळाव्यासाठी मनसेने छापले खास टीशर्ट, पाहा व्हिडिओ

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

Hockey Asia Cup: पाकिस्तान खेळणार 'आशिया कप', हॉकी संघ भारतात येणार: क्रीडा मंत्रालयाचा हिरवा कंदील

Underi : उंदेरी किल्ला कधी पाहिला का? पावसाळ्यात ट्रिप प्लान कराच

Marathi Vijay Melava : "गुजरात फॉर्म्युला महाराष्ट्रात विषासारखा पसरला आहे"; ठाकरेंचा फडणवीस सरकारवर टीकेचा बाण

SCROLL FOR NEXT