धक-धक' गर्ल माधुरी दीक्षित म्हणतेय, 'योगासांनाना जीवनाचा भाग बनवा

 

Saam Tv 

मनोरंजन बातम्या

धक-धक' गर्ल माधुरी दीक्षित म्हणतेय, 'योगासांनाना जीवनाचा भाग बनवा

माधुरी दीक्षित सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असते आणि बर्‍याचदा तिचा डान्स, वर्कआउट व्हिडिओ चाहत्यांसाठी शेअर करते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

'धक-धक' गर्ल माधुरी दीक्षित आजकाल चित्रपटांपेक्षा टीव्ही आणि सोशल मीडियावर अधिक सक्रिय आहे. माधुरीने 'आंतरराष्ट्रीय योग दिना'च्या अवघ्या 3 दिवस आधी तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक योगासनांचा एक व्हिडिओ आपल्या चंहत्यांसाठी केला आहे. या व्हिडिओमध्ये माधुरीने घरी राहून योगासने काशी करावीत, हे सांगितले आहे. व्हिडिओ शेअर करताना 'योगासांनाना जीवनाचा एक भाग बनवा', अशी कॅप्शन माधुरीने लिहिली आहे. तथापि, माधुरी दीक्षितशिवाय बिपाशा बसू, शिल्पा शेट्टी कुंद्रा, मलाइका अरोरा या बॉलिवूड अभिनेत्री वर्कआउटपेक्षा योगासनांना अधिक प्राधान्य देतात आणि बर्‍याचदा योगासनांचे व्हिडिओ सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करत असतात.

'योगासने नेहमीच माझ्या तंदुरुस्तीचे रहस्य राहिले आहे. #InternationalYogaDay काही दिवसांतच येणार आहे. मी तुम्हाला काही सोपे आसन कसे करायचे ते सांगणार आहे. या आसनांमुळे तुमचे पाठीचे हाड मजबूत होईल आणि तुम्ही तणाव-थकवापासून मुक्त व्हाल,'' अशी पोस्टही तिने आपल्या व्हिडिओसोबत शेयर केली आहे. या व्हिडिओमध्ये माधुरी 'भुजंगासन' करताना दिसत आहे. आज आपण 'भुजंगासन' करू. असे म्हणत तिने योगासनांना जीवनाचा एक भाग बनवा.' असेही म्हटले आहे. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांनीही हा व्हिडिओ खूपच पसंत केला आहे. माधुरीने व्हिडिओ पोस्ट केल्यापासून आता पर्यन्त 70 हजाराहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

माधुरी दीक्षित सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असते आणि बर्‍याचदा तिचा डान्स, वर्कआउट व्हिडिओ चाहत्यांसाठी शेअर करते. माधुरी पती आणि मुलासह व्हिडिओ शेयर करत राहते. जे चाहत्यांना खूप आवडतात. एकट्या इंस्टाग्रामवर माधुरीचे 20 दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स आहेत.

Edited By- Anuradha Dhawade

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: बारामतीमध्ये अजित पवारांच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष करायला सुरुवात

South Indian Star : दाक्षिणात्य कलाकारांना मुंबईची भुरळ, रश्मिका मंदानासह 'या' सेलिब्रिटींनी घेतले आलिशान फ्लॅट

Maharashtra Election Results : बाळासाहेब थोरात, तानाजी सावंत, अब्दुल सत्तार पिछाडीवर, टॉप १० मतदारसंघातल्या लढतीत काय स्थिती

Healthy Breakfast: नाश्त्यासाठी बनवा कमी साहित्याचा 'हा' पौष्टीक पदार्थ

Chopda Vidhan Sabha : निवडणुकीचे काम टाळणाऱ्या २१ कर्मचाऱ्यांवर गुन्हा; विनापरवानगी राहिले गैरहजर

SCROLL FOR NEXT