डिओडोरेंट तुमच्या स्तनांसाठी हानिकारक आहेत का ?

अँटीपर्सिरेंट डीओडोरंटमध्ये असणारे अॅल्युमिनियम आपल्या शरीरासाठी हानिकारक असल्याचे संशोधनातून आढळून आले आहे.
डिओडोरेंट तुमच्या स्तनांसाठी हानिकारक आहेत का ?

डिओडोरेंट तुमच्या स्तनांसाठी हानिकारक आहेत का ?

Google 

Published On

बर्‍याच स्त्रिया विशेषत: उन्हाळ्याच्या काळात अँटीपर्सिरंट आणि डिओडोरेंट वापरतात. ही उत्पादने घाम येण्याला प्रतिबंधित करण्यासाठी प्रभावी आहेत. परंतु या उत्पादनांचा त्वचेवर काही दुष्परिणाम होऊ शकतो का, यावर केवळ चर्चा करत असतात. मात्र आता या उत्पादनांचा शरीरावर दुष्परिणाम होत असल्याचे एक अभ्यासातून समोर आले आहे.त्वचेच्या थेट संपर्कात येणारे हे अँटीपर्सपिरंट्स आणि डीओडोरंट्स आपल्या आरोग्यावर घातक परिणाम करू शकतात, असे या संशोधनातून आढळून आले आहे.

शरीरातील घामाचा दुर्गंध येऊ नये म्हणून बाजारात अशी एक ना दोन अनेक उत्पादने उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे ही उत्पादने टू इन वन आहेत. म्हणजेच एकाच बाटलीमध्ये डिओडोरेंट आणि अँटीपर्सिरंट दोन्ही आहेत. मात्र अँटीपर्सिरेंट डीओडोरंटमध्ये असणारे अॅल्युमिनियम आपल्या शरीरासाठी हानिकारक असल्याचे संशोधनातून आढळून आले आहे.

- हे कसे काम करतात

अँटीपर्सिरेंट डीओडोरंट्स सक्रिय घटक म्हणून अॅल्युमिनियम-आधारित संयुगे वापरतात. ही संयुगे घामाच्या नलिकामध्ये तात्पुरते "प्लग" तयार करतात, ज्यामुळे त्वचेच्या पृष्ठभागावर घामाचा प्रवाह रोखला जातो. नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या काही संशोधनात असे आढळून आले आहे की,अॅल्युमिनियमयुक्त अंडरआर्म अँटीपर्सपिरंट्स बहुतेकदा स्तनाच्या जवळच त्वचेवर स्प्रे केले जातात. त्यामुळे त्वचा ही संयुगे शोषून घेते जे शरीरातील इस्ट्रोजेन हार्मोनवर परिणाम करते.

- तुमच्या आरोग्यावर त्याचा काय परिणाम होतो?

अँटीपर्सिरेंट डिओडोरंट्स स्तनाच्या कर्करोगाचे कारण आहे का? याबाबत अनेकदा चर्चा होत असते. खरं तर, अँटीपर्सिरेंट आणि इतर त्वचेची काळजी घेणाऱ्या उत्पादनांमध्ये अॅल्युमिनियमविषयी सर्वात सामान्य चिंता म्हणजे स्तनाचा कर्करोग होऊ शकतो की नाही. याबाबत अनेक समज गैरसमज निर्माण झाले आहेत.

- संशोधन काय म्हणते ?

अँटीपर्सिरेंट डिओडोरंट्स वापरल्याने स्तनाचा कर्करोग होऊ शकते किंवा वाढू शकतो, अशी कोणतीही वैज्ञानिक बाब अद्याप तरी समोर आली नसल्याचे निरीक्षण अमेरिकन कॅन्सर सोसायटीने नोंदवले आहे. तथापि, अँटीपर्सिरेंटपासून बनविलेले अॅल्युमिनियमयुक्त क्षार आपल्या त्वचेद्वारे शोषले जाऊ शकतात आणि स्तनाच्या ऊतकात जमा होऊ शकतात, जे आपल्या स्तनासाठी हानिकारक आहे. असेही संशोधकांचे म्हणणे आहे.

<div class="paragraphs"><p>डिओडोरेंट तुमच्या स्तनांसाठी हानिकारक आहेत का ?</p></div>
हळदीचे दूधाचे असेही आहेत दुष्परिणाम

2018 च्या वैद्यकीय अभ्यासानुसार, जास्त प्रमाणात अ‍ॅल्युमिनियम शरीरातील उत्पादनात किंवा महिला संप्रेरक एस्ट्रोजेनला दिलेला प्रतिसाद बदलू शकतो. अंतःस्रावी (संप्रेरक) प्रणालीत झालेले बदल वेळोवेळी आपल्या शरीरासाठी हानिकारक असू शकतात, असेही या संशोधनातून समोर आले आहे.

दुसर्‍या 2017 च्या वैद्यकीय अभ्यासानुसार स्तनाचा कर्करोग झालेल्या 209 महिला आणि स्तनाचा कर्करोग नसलेल्या 209 महिलांना त्या अँटीपर्सिरेंट वापरतात का आणि वापरत असल्यास कितीदा वापरता, असे प्रश्न विचारण्यात आले. स्तनाचा कर्करोग असलेल्या महिलांच्या गटाने, त्यांनी 30 व्या वर्षापूर्वी अनेकदा अँटीपर्सपिरंट वापरला असल्याचे सांगितले.

तर दुसरीकडे, ज्या स्त्रियांना स्तनाचा कर्करोग नव्हता, अशा स्त्रियांनीदेखील अँटीपर्सिरेंटचा कमी वापर केल्याचे सांगितले. त्यांच्यावर करण्यात आलेल्या वैद्यकीय तपासणी नंतर दोन्ही गटांच्या महिलांच्या स्तनाच्या ऊतकांमध्ये एल्युमिनियमचे क्षार असल्याचे दिसून आले. तथापि, ज्या स्त्रिया अँटीपर्सपिरंट्स वापरतात त्यांच्यामध्ये अ‍ॅल्युमिनियम क्षारांची मात्रा जास्त असते.

अ‍ॅल्युमिनियममुळे कर्करोग होतो का याबद्दल वैद्यकीय संशोधन काम करत आहे. त्याचबरोबर, अँटीपर्सिरेंट डिओडोरंट्स अल्युमिनियममुळे स्तनाचा कर्करोग होतो असा कोणताही वैज्ञानिक पुरावा अद्याप मिळालेला नाही. या संदर्भात अद्याप संशोधन चालू आहे. जर आपण बर्‍याच काळापासून अँटीपर्सिरेंट डीओडोरंट वापरत असाल तर त्यातील अ‍ॅल्युमिनियम स्तनाच्या ऊतकांमध्ये जमा होऊ शकतो आणि अ‍ॅल्युमिनियममुळे तुमची अंतःस्रावी यंत्रणा बिघडू शकते, हे लक्षात घेणे अधिक गरजेचे आहे. तर महिलांनो, शक्य तितक्या लवकर डीओडोरंटचा वापर टाळा आणि आपल्याला अधिक डीओडोरंटची आवश्यकता असल्यास आपण अँटीपर्सिरेंट फ्री डीओडोरंट वापरू शकता.

Edited By- Anuradha Dhawade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com