हळदीचे दूधाचे असेही आहेत दुष्परिणाम

परंतु हळदीचे दूध सर्व लोकांसाठी फायदेशीर असतेच असे नाही. हळदीच्या दुधाचे काही दुष्पपरिणामही होऊ शकतात.
हळद दूध 

हळद दूध 

साम टीव्ही 

Published On

हळदीच्या दुधात आश्चर्यकारक गुणधर्म असतात. जखम किंवा सर्दीसाठी हळदीचे दूध अत्यंत प्रभावी मानले जाते. परंतु हळदीचे दूध सर्व लोकांसाठी फायदेशीर असतेच असे नाही. हळदीच्या दुधाचे काही दुष्पपरिणामही होऊ शकतात. याचे अनेक कारणे आहेत. त्यामुळे काही ठरविक लोकांनी हळदीचे दूध प्यायल्याने त्यांना गंभीर परिणामांना सामोरे जाऊ लागू शकते. त्यामुळे त्यांनी हळदीच्या दुधाचे सेवन करू नये.

यकृताचा त्रास असेल तर हळदीचे दूध पिऊ नका

एखाद्या व्यक्तीला यकृताशी संबंधित कोणताही रोग किंवा समस्या असल्यास त्या व्यक्तीने हळदीचे दूध पिऊ नये. या समस्येमध्ये हळदीच्या दुधाचे सेवन केल्यास हा आजार अधिक वाढू शकतो.

नपुंसकत्व होऊ शकते

हळद टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी करते. यामुळे शुक्राणूंची क्रिया कमी होते. जर आपण आपले कुटुंब वाढवण्याची योजना आखत असाल तर हळदीच्या दुधाचे मध्यम प्रमाणात सेवन करण्याचा प्रयत्न करा.

<div class="paragraphs"><p>हळद दूध&nbsp;</p></div>
12वी मूल्यांकनासाठी CBSE कडून 30-30- 40 चा फॉर्म्युला

गर्भवती महिलांनी हळदीचे दूध पिऊ नये

बर्‍याच गर्भवती महिलांना गोऱ्या रंगाचे बाळ होण्यासाठी घरगुती उपचारांच्या आधारे हळदीचे दूध पिण्याचा सल्ला दिला जातो. मात्र गर्भवती महिलांनी हळदीचे दूध पिल्याने पोटातील उष्णता वाढते. त्यामुळे हळदीचे दूध गर्भाशयाच्या गंभीर समस्या उद्भवू शकतात. या कारणास्तव गरोदरपणाच्या तीन महिन्यांत हळदीच्या दुधाचे सेवन करणे विशेषतः धोकादायक आहे.

शरीराचे तापमान उष्ण असणाऱ्या लोकानी

प्रत्येक व्यक्तीचे शरीराचे तापमान भिन्न असते. सामान्यत: ज्या लोकांना गरम पदार्थ खाण्याचा त्वरित परिणाम होतो, त्यांनी हळद असलेले दूध पिऊ नये. यामुळे शरीरातील उष्णता वाढते, ज्यामुळे आपल्याला मुरुम, बद्धकोष्ठता, खाज सुटणे आणि अस्वस्थता यासारख्या समस्या येतात.

अॅलर्जीग्रस्त व्यक्ती

ज्या व्यक्तीला मसाले किंवा गरम पदार्थ खाल्ल्यामुळे अॅलर्जीची समस्या उद्भवते, त्याने हळदीचे दूधही सेवन करू नये. हळदीचे दूध तुमच्या अॅलर्जीत अधिक वाढ करते. हळद पित्ताशयामध्ये दगड तयार करणारी एजंट म्हणूनही काम करू शकते.

Edited By- Anuradha Dhawade

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com