Saam Tv
कामाच्या धावपळीत घरात आपण नाश्ता करणे टाळतो. कारण त्याला वेळ लागतो.
आता तुम्हाला याची चिंता नको अगदी पाचच मिनिटांत तुम्हाला घरगुती पद्धतीचा आणि सगळ्यात पौष्टीक डोसा ही रेसिपी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
तुम्ही तांदुळ स्वच्छ धुवून ते रात्रभर भिजत ठेवा मग मिक्सरला लावून बारिक करा. बाहेरचे पीठ विकत आणू नका. ते जास्त खराब झालेले सुद्धा असू शकते.
तांदळाचे पीठ, मीठ, तेल
तांदळाचे पीठ व्यवस्थित पातळ करा. त्याची कंसिस्टेंसी योग्य प्रमाणात असू नाहीतर तुमचे डोसे गोल होणार नाहीत.
एक मोठे भांडे घ्या आणि त्यात मीठ आणि थोडे पिठ एकत्र करा. मग पाणी ओतून व्यवस्थित बॅटर तयार करा.
आता गॅसवर नॉन स्टीकचा पॅन ठेवा आणि स्लो गॅसवर गरम करा.
पॅन हलका गरम झाला की, त्यावर तेल किंवा तुप पसरवा.
आता एका पळीने किंवा वाटीच्या मदतीने तुम्ही डोशाचे पीठ पसरवा.
आता वरची बाजू सुकली की, डोसा दुसऱ्या बाजूने अर्धा मिनीट शेकवा. झाला झटपट कर्नाटक स्टाईल हेल्दी डोसा तयार.
NEXT: तुमच्या जोडीदाराला द्या 'या' रंगाचा रत्न, प्रेमात गोडवा वाढेल ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई