Deool Band 2 Box Office Collection  Saam tv
मनोरंजन बातम्या

Deool Band 2 Box Office Collection: 'देऊळ बंद २' ची बक्कळ कमाई, ८ व्या दिवशीही कमावले कोट्यवधी, आतापर्यंत एकूण कमाई किती? वाचा सविस्तर

Deool Band 2 Collection: प्रविण तरडे दिग्दर्शित 'देऊळ बंद २' या चित्रपटाची ८ दिवसांची कमाई किती झाली आहे हे पाहूया.

Manasvi Choudhary

Pravin Tarde 'Deool Band 2' Movie Box Office Collection:

सिनेसृष्टीत सध्या 'देऊळ बंद 2' या चित्रपटाने चांगलाच धुमाकळू घातलाय. प्रवीण दरडे यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला हा चित्रपट पाहण्यासाठी दररोज सिनेमेगृह हाऊफुल्ल होत आहेत. २१ मे रोजी रिलीज झालेल्या या चित्रपटाने आठवडाभरात कोट्यावधींचा टप्पा गाठला आहे. आता या चित्रपटाच्या आठव्या दिवसाचे कलेक्शन समोर आलं आहे. यासह चित्रपटाची एकूण कमाई किती? हे देखील पाहूया.

'देवाची भक्ती आणि श्रद्धा' यावर आधारित असलेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात घर करत आहे. २१ मे ला रिलीज झाल्यापासून चित्रपट प्रेक्षकांच्या पंसतील उतरला आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने तब्बल 2.25 कोटींचा गल्ला जमावला होता.

किती झाली एकूण कमाई?

'देऊळ बंद 2' या चित्रपटाने पहिल्याच तीन दिवसांत तब्बल 11 कोटींच्या आसपास कमाई केली होती. त्यानंतर पुढील दोन दिवसांत 12 कोटी रूपये इतके कमावले होते.7 व्या दिवशी या चित्रपटाने 3.35 कोटी रूपये इतकी कमाई कली. आता सॅकनिल्कने दिलेल्या माहितीनुसार, 'देऊळ बंद 2' चित्रपटाने गुरूवारी म्हणजे आठव्या दिवशी 4.35 कोटी रूपयांचा गल्ला जमवला आहे. या चित्रपटाने गेल्या आठवडाभरात एकूण 30.30 कोटी रूपये इतकी कमाई केलीये.

देऊळ बंद 2' या चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद पाहून चित्रपटातील कलाकार भारावले आहेत.या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी , स्नेहल तरडे, ओम भूतकर, गश्मीर महाजनी, महेश मांजरेकर, प्रसाद ओक आणि संस्कृती बालगुडे या कलाकारांनी भूमिका साकारल्या आहेत. काल अभिनेत्री स्नेहल तरडेने भावूक पोस्ट शेअर केली होती. आता पुढच्या आठवड्यात चित्रपट किती कमाई करतो? याकडे सर्वाचेच लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दादरमध्ये महानगर गॅस पाइपलाइन फुटली, मोठ्या प्रमाणात गळती

Maharashtra Politics: भाजपकडून शिंदे अन् ठाकरेंना मोठा धक्का, ३ बड्या नेत्यांसह १०० पदाधिकाऱ्यांनी हाती घेतलं 'कमळ'

दारुच्या नशेत मुलासह पाण्यात उतरले, पण तिथेच काळाने गाठले, बापासह निष्पाप चिमुकल्याचाही गेला जीव

Walking Effect: रोज १० हजार स्टेप्स चालल्याने खरच गुडघ्यांना त्रास होतो का? जाणून घ्या डॉक्टर काय सांगतात?

Rishabh Pant : आयपीएल विश्वात खळबळ!ऋषभ पंतनं अचानक घेतला मोठा निर्णय, LSG चे कर्णधारपद सोडलं

SCROLL FOR NEXT