Deool Band 2 Saam Tv
मनोरंजन बातम्या

Deool Band 2 Collection: बॉक्स ऑफिसवर दुमदुमला स्वामी समर्थांचा जयघोष; 'देऊळ बंद २'ची पहिल्याच दिवशी जोरदार कमाई

Deool Band 2: ‘देऊळ बंद २’ चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत आहे. महाराष्ट्रभरातील थिएटरमध्ये स्वामी समर्थांच्या जयघोषाने वातावरण भारावले आहे.

Shruti Vilas Kadam

Deool Band 2: मराठी चित्रपटसृष्टीतील बहुप्रतीक्षित ‘देऊळ बंद २’ या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर दमदार सुरुवात केली आहे. पारंपरिक शुक्रवारऐवजी गुरुवारी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर चित्रपट प्रदर्शित करण्यात आला आणि पहाटेच्या शोसाठीही प्रेक्षकांनी थिएटरमध्ये मोठी गर्दी केली. विशेष म्हणजे, गुरुपुष्यामृत योग साधत चित्रपट रिलीज करण्यात आल्याने वातावरण अधिक भक्तिमय झाल्याचं पाहायला मिळालं.

राज्यातील अनेक चित्रपटगृहांमध्ये पहिल्याच दिवशी शो हाऊसफुल्ल झाल्याचं चित्र दिसून आलं. मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, जळगाव, विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याची माहिती समोर आली आहे. थिएटरबाहेर स्वामी समर्थांच्या नामाचा जयघोष आणि भक्तिमय वातावरणामुळे चित्रपटाची वेगळीच चर्चा रंगली आहे. या चित्रपटाने काल पहिल्याच दिवशी 1,175 शोजमधून 2.45 कोटींचं कलेक्शन केलं आहे. 

२०१३ साली प्रदर्शित झालेल्या ‘देऊळ बंद’ या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं होतं. आता त्याचा सिक्वेल असलेल्या ‘देऊळ बंद २’लाही तसाच प्रतिसाद मिळताना दिसत आहे. चित्रपटात अध्यात्म, श्रद्धा, रहस्य आणि मनोरंजन यांचा उत्तम मिलाफ पाहायला मिळत असल्याचं प्रेक्षकांचं म्हणणं आहे. त्यामुळे चित्रपटाबद्दलची उत्सुकता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.

पहिल्याच दिवशी संपूर्ण महाराष्ट्रातील ५०० सिनेमागृहांमध्ये चित्रपटाचे २ हजारांहून अधिक शो प्रदर्शित झाले. पुण्यातील सिटी प्राईड मल्टिप्लेक्समध्ये ‘देऊळ बंद २’चे तब्बल २५ शो हाऊसफुल्ल झाले आहेत. एका मराठी चित्रपटाला मिळालेला हा प्रतिसाद विक्रमी मानला जात असून, चित्रपटाच्या लोकप्रियतेची जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटात प्रवीण तरडे, मोहन जोशी, स्नेहल तरडे आणि गश्मीर महाजनी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. कलाकारांच्या अभिनयासोबतच चित्रपटातील आध्यात्मिक वातावरण आणि भावनिक कथानक प्रेक्षकांना भावत असल्याचं बोललं जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident News : भरधाव बस काळ बनून आली, रिक्षाला १०० मीटरपर्यंत फरफटत नेले; देवदर्शनाला जाणाऱ्या एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू

Chanakya Niti: तुम्हाला इज्जत घालवायची नसेल तर या ५ ठिकाणी बोलवल्यावरही जावू नका

Maharashtra News Live Update: पुणे जिल्ह्याच्या भोर तालुक्यात मुसळधार पाऊस

Mumbai : मुंबईतील इंटेरिअर डिझायनर अडकला हनीट्रॅपमध्ये, तरुणीने घातला तरुणाला २१ लाखांचा गंडा

PM मोदींना झालमुडी देणाऱ्या विक्रेत्याला धमक्या; PAK आणि बांग्लादेशमधून फोन कॉल्स, मोदींसोबतचा क्षण ठरला डोकेदुखी?

SCROLL FOR NEXT